कल्याण- कल्याण ग्रामीण भागात दर वर्षी मोठ्या उत्साहात होळीचा उ्त्सव साजरा केला जातो. होळीनिमित्त जळणाऱ्या होळीला पोळीचा नैवैद्य दाखविण्याची पद्धत आहे. यात नैवेद्याच्या रूपाने होळीत पुरणपोळी आणि अन्न अर्पण केले जाते. या पार्श्वभूमीवर सामाजिक भान जपून पुरणपोळी आणि इतर अन्न दार्थ जळणाऱ्या होळीत अर्पण न करता गरजूना देण्याचा उपक्रम रायते गावाने राबविला.
म्हसकळ आणि मामनोली येथील जीवन संवर्धन आणि समतोल फॉउंडेशन समतोल फॉउंडेशनमधील अनाथ मुलांना या पुरणपोळ्यांचे वाटप करण्यात आले. होळीला पुरणपोळ्या मिळाल्याने लहान मुलांच्या चेहऱ्यावर देखील आनंद झळकला. होळीच्या दिवशी होळीमध्ये नैवेद्य अर्पण करण्याऐवजी पुरणपोळी संकलित करण्यात आली.
होळीमध्ये टाकून वाया जाणारे अन्न गरीब गरजांच्या पोटात जात असल्याने हा उपक्रम राबविताना खूप समाधान मिळते अशा भावना आयोजकांनी व्यक्त केली.