- सचिन सागरे डोंबिवली - देसाई गाव येथे काम चालू असलेल्या एका लिफ्टच्या डक्टमध्ये एक साप व त्याची काही पिल्लं असल्याची माहिती वॉर फाउंडेशनचे सर्पमित्र विशाल सोनवणे यांना मिळाली. तेव्हा ते व त्यांचा सहकारी समद खान यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. लिफ्टच्या डक्टमध्ये अडकलेला साप हा घोणस जातीचा अतिविषारी साप असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सदर सापाने तिथे २५ पिल्लांना जन्म दिल्याचे दिसून आले. विशाल यांनी मादा घोणस सापासह २५ पिल्लांचा सुखरूप बचाव करून निसर्ग मुक्त केले.घोणस हा साप भारतातील प्रमुख चार विषारी सापांपैकी एक आहे. हा साप अंडी न घालता सरळ पिल्लांना जन्म देतो अशी माहिती सर्पमित्र सोनवणे यांनी दिली.
Dombivali: लिफ्टच्या डक्टमध्ये मिळाले घोणस जातीच्या सापासह २५ पिल्लं
By सचिन सागरे | Published: July 27, 2024 8:14 PM