डोंबिवली: नांदीवलीत साचणार्या पाण्यावर त्वरित उपाययोजना करण्याचे आदेश खासदार श्रीकांत शिंदे यांनी नुकतेच दिले होते, त्यानुसार श्री स्वामी समर्थ मठ परिसरात शनिवारपासून काम सुरू झाले आहे. तेथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे पाणी साठण्याची मोठी समस्या निर्माण झाली होती.
सदर समस्येबाबत खासदार श्रीकांत शिंदे यांना स्थानिक नागरिकांनी तक्रार केली होती, त्याची दखल घेत शिंदे यांच्या सूचनेनुसार महापालिकेने सकाळी ९ पासून शिवसेना मध्यवर्ती शाखा आणि स्थानिक पदाधिकारी ह्यांच्या देखरेखिखाली, महापालिका अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने समर्थ नगर ठिकाणी ५० सफाई कामगार, २ जेसीबी, सक्शन मशीन याच्या साहाय्याने गाळ काढून पाण्याचा निचरा होण्यासाठी काही तात्पुरते प्रयत्न करण्याचे काम सुरू झाले, जिथे जिथे पाणी तुंबले जाते तिथे गटारे तोडून नवीन चेंबर तयार करणे, अरुंद नाले रुंद करण्याचे तातडीचे काम सुरू आहे, महापालिकेचा निधी कमतरतेमुळे अनेक दिवस येतील कामे खोळंबली आहेत ती कामे व पावसाळ्यानंतर रोड आणि नाल्यापर्यंत पाण्याचा निचार होण्यासाठी उपाययोजनेचे नियोजन करण्यात येणार असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले.