शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

डाेंबिवली MIDC स्फोट प्रकरण: मलय, स्नेहाला न्यायालयीन कोठडी; अधिकाऱ्यांची होणार चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2024 8:46 AM

न्यायालयाने पोलिसांची मागणी विचारात न घेता दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली, अशी माहिती गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कोळी यांनी दिली.

लाेकमत न्यूज नेटवर्क, कल्याण: डाेंबिवली एमआयडीसीतील अमूदान कंपनीत स्फोट प्रकरणातील आरोपी मलय आणि स्नेहा मेहता या दोघांना शुक्रवारी कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. या दोघांच्या न्यायालयीन कोठडीनंतर पोलिसांनी त्यांच्या तपासाची दिशा दुसरीकडे वळविली आहे. अमूदान कंपनीचे सेफ्टी ऑडिट केले होते की नाही? जर केले नसले तर संबंधित सरकारी यंत्रणांमधील अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात येणार आहे. ते जर दोषी आढळल्यास त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

कंपनीचा मालक मलय याला अटक केल्यावर त्याला प्रथम पाच दिवसांची त्यानंतर दोन दिवसांची अशी सात दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. मलयची पत्नी स्नेहा हिला घाटकोपर येथील घरातून अटक केली. स्नेहा यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली होती. मलय, स्नेहा या दोघांना कल्याण न्यायालयात हजर केले असता तपास कामी पोलिसांनी चार दिवसांची पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी केली. न्यायालयाने पोलिसांची मागणी विचारात न घेता दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली, अशी माहिती गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कोळी यांनी दिली. 

मलय यांना मानसिक धक्का

या घटनेनंतर मलय यांनाही मानसिक धक्का बसल्याने त्यांनी फायर ऑडिटसाठी अर्ज कधी केला होता हेही आठवत नाही. या कंपनीचे औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालयाकडून सेफ्टी ऑडिट केले होते की नाही? याची विचारणा केली. संबंधित यंत्रणेकडून त्याचा अहवाल येत्या आठ दिवसात येणे अपेक्षित आहे. सेफ्टी ऑडिट केले नसल्यास संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी केली जाईल, असे तपास अधिकारी कोळी यांनी सांगितले.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीBlastस्फोट