डोंबिवली : रोजगार मिळण्याच्या तयारीने आम्ही इथे आलो, पण इथं रोजच मृत्यूची टांगती तलवार, काय करायच, एकीकडे शिक्षण कमी घरच्या जबाबदाऱ्या आणि दुसरीकडे अस आग, स्फोट वातावरण त्यामुळे खूप भीती वाटते अस वर्णन घाबरलेल्या कामगारांनी केले. तर दुसरीकडे आणखी किती केमिकल साठा करवून ठेवलाय एकदा जाहीर तरी करा, सांगा ना कस रहायचा कस जगायच असा सवाल येथील नागरिक करत आहेत.
पंधरा दिवसांपूर्वी अंबरमध्ये (अमुदान) स्फोट झाला आता इंडो अमाईनमध्ये।पुन्हा स्फोट झाला हे किती दिवस चालणार? यावर काही तोडगा आहे की नाही, की सगळं असच अनागोंदी कारभार सुरू राहणार . संतप्त नागरिकांनी सवाल केला आणि त्यांना रडू कोसळले. कामगार रोजीरोटीसाठी येतात आणि त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागते, वर्षानुवर्षे असच सुरू आहे.
आगीचे लोळ, धूर बाहेर आला तर समजले पण आतल्या आत काही झाले तर कोणाला समजत पण नसेल इथे राहणे, नोकरी करणे कठीण झाले आहे. राजकीय पक्ष, शासन काही करत नाही, फक्त अपघात झाला की येतात आणि घोषणा करून जातात, पुन्हा स्थिती जैसे थे. शासकीय यंत्रणा तर एकाहून एक आहेत, सामान्यांच्या जीवाचे कोणाला काही पडलेलं नाही ही शोकांतिका आहे अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.
दरम्यान, डोंबिवली एमआयडीसीमध्ये स्विचिंग स्टेशनच्या बाजूला असलेल्या कंपनीमध्ये आग लागल्याने सर्व उच्चदाब वाहिन्या सुरक्षेच्या दृष्टिने बंद केल्या आहेत तरी सर्व ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.