डोंबिवली - दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा असे म्हटले जाते. मात्र डोंबिवलीतील औद्योगिक निवासी परिसरातील नागरिकांच्या घरी दिवाळीत पाणी येत नसल्याने दिवाळी साजरी कशी करायची असा संतप्त सवाल उपस्थित करीत संतप्त नागरीकांनी डोंबिवली एमआयडीसी कार्यालयावर धाव घेतली. पाणी आले नाही तर आम्ही तुमच्या घरी येणार असा इशारा अभियंत्यास दिला आहे.
डोंबिवली निवासी परिसरात 30 हजार लोकांची लोकवस्ती आहे. बंगले आणि सोसायटय़ा असलेल्या या भागातील नागरिकांना दिवाळीच्या सणाला पाणी मिळत नाही. गेल्या तीन दिवसापासून पाणी पुरवठा खंडीत झाला आहे. त्यामुळे पाण्याशिवाय घरात दिवाळी कशी साजरी करायची असा प्रश्न या नारीकांना उपस्थइत केला. संतप्त नागरीक वर्षा म्हाडीक, सुप्रिया दामले, राजू नलावडे, चंद्रकांत म्हात्रे, प्रफुल्ल बोरकर या नागरीकांनी आज एमआयडीसी कार्यालयावर घाव घेतली. यावेळी त्याठीकाणी पोलिसही पोहचले होते. पोलिसांनी त्यांना आत जाण्यास मज्जाव केला. तेव्हा नागरीकांनी आधी कार्यकारी अभियंत्याना पाचारण करा अशी जोरदार मागणी केली. कार्यकारी अभियंते येऊ शकणार असे सांगण्यात आले. त्यांच्या ऐवजी तांत्रिक अभियंते प्रमोद चिनावले त्याठिकाणी पोहचले. नागरीकांनी चिनावले यांची भेट घेऊन संताप व्यक्त केला.
चिनावले यांनी सांगितले की, या भागाला जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातून पुरवठा केला जातो. त्याठीकाणचा वीज पुरवठा खंडीत झाल्याने डोंबिवली निवासी भागाचा पाणी पुरवठा बंद आहे. दुपार्पयत सुरळित केला जाईल असे सांगितले. त्यावर नागरीकांनी सांगितले की, पाणी पुरवठा सुरळित झाला नाही तर नागरीक तुमच्या घरी येऊन राहणार असा इशारा दिला. पाणी पुरवठय़ाची समस्या केवळ तीन दिवसापूरती नाही. ती वारंवार उद्भते. जलवाहिन्या वारंवार फुटल्या जातात. त्यांच्या दुरुस्तीकरीता पाणी पुरवठा बंद ठेवला जातो. ही समस्या कधी सुटणार असा प्रश्न उपस्थित केला. निवासी भागातील नागरीक पाण्याचे बिल नियमीत भरतात. तरी त्यांच्या नशीबी पाण्याविना राहण्याची वेळ का येते याकडे लक्ष वेधले.
यासंदर्भात अभियंते चिनावले यांनी सांगितले की, निवासी भागातील जलवाहिन्या या जुन्या आणि कमी इंची होती. त्या बदलण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. येत्या दोन महिन्यात हे काम देखील पूर्ण केले जाईल.