शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

डोंबिवली : ढगांचा गडगडाट, वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी

By अनिकेत घमंडी | Published: September 07, 2022 5:20 PM

उकाड्याने हैराण झालेल्या लोकांना थोडासा दिलासा मिळाला.

डोंबिवली: शहरात दोन दिवसांपासून प्रचंड उकाडा वाढलेला असतानाच बुधवारी संध्याकाळी ४ नंतर ढगांच्या गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. काही क्षणात वातावरणात गारवा पसरला.

ढगांचा गडगडाट आणि विजा चमकल्याने रस्तावरील नागरिकांची आडोसा घेण्यासाठी धावपळ झाली. पावसाची जोरदार सर आल्याने व्यावसायिक, फेरीवाले आदींची पंचाईत झाली. दिवसभर ऊन पडले होते, काही वेळातच आकाशात काळे ढग आले असून जोरदार पावसाला सुरुवात झाली.

शाळेतून घरी येणाऱ्या विद्यार्थ्यांचीही देखील या अचानक आलेल्या पावसामुळे पंचाईत  झाली. दप्तर भिजू नये म्हणून काहींनी दुकानाबाहेरच्या शेडचा आधार घेतला, दुचाकी स्वारांना वाहने थांबवून मिळेल तिथे उभे रहावे लागल्याचे निदर्शनास आले. काही मिनिटात उकाड्याची जागा गारव्याने घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.

विजा चमकायला लागल्याने शहरातील इंटरनेट सेवा देणाऱ्या काही खासगी व्यावसायिकांनी सुरक्षेच्या कारणाने सेवा काही वेळ बंद ठेवली. त्याबाबत त्यांनी ग्राहकांना सूचित केले आणि सेवा सुरळीत कधी होईल याबाबतचे संदेशही पाठवण्यात आले. सध्या पावसाचा जोर कमी झाल्याने पाऊण तासानंतर इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीRainपाऊस