डोंबिवली- ठाण्यातील कोलशेत येथील वायुसेना स्टेशन मधील केंद्रीय विद्यालयाची तळमजला+तीन मजली असलेले इमारत सन २०१७ मध्ये धोकादायक झाल्याने विद्यार्थ्यांचे पुनर्वसन तात्काळ करा तसेच नव्याने होत असलेल्या इमारतीचे काम गेले तीन वर्षापासून बंद पडलेले आहे त्या संबंधित ठेकेदारावर तात्काळ कार्यवाही करून काम सुरू करावे अशी मागणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे खासदार राजन विचारे यांनी केली आहे.
त्यांनी त्यासंदर्भात पाठवलेल्या पत्रासंदर्भात शुक्रवारी माहिती दिली, ते म्हणाले।की, भारतीय वायुसेना भारतीय सैनिकांची मुले तसेच केंद्र सरकारच्या खात्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मुले व नागरिक वस्तीतील काही मुले असे एकूण १४९१ विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालून शिकत आहेत.
देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबीयांना शिक्षण चांगल्या नव्याने होत असलेल्या इमारतीत व्हावे तसेच धोकादायक ठरवलेल्या इमारतीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका असल्याने त्यांचे तात्काळ पुनर्वसन करावे अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.