कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदार यादी प्रसिद्ध झाली असून या मतदार यादीनुसार महापालिका हद्दीत 12 लाख 39 हजार 130 मतदार आहे. हे मतदार 31 मे अखेर नोंदविले गेले आहेत. या यादीवर मतदारांच्या हरकती सूचना मागविण्यात येणार असून त्यानंतर 9 जुलै रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती महापालिकेचे प्रभारी आयुक्त दयानिधी राजा यांनी दिली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत पुरुष मतदारांची संख्या 6 लाख 61 हजार 822 आणि महिला मतदारांची संख्या 5 लाख 76 हजार 934 इतकी आहे. तसेच अन्य मतदारांची संख्या 376 आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार यादीवर नागरीक आज 23 जून पासून 1 जुलैर्पयत हरकती सूचना नोंदवू शकतात. नागरीकांच्या हरकती सूचना नोंदविल्यानंतर 9 जुलै रोजी मतदारांची अंतिम यादी प्रसिद्द केली जाणार आहे. आज प्रसिद्ध करण्यात आलेले मतदार प्रारुप यादी ही महापालिका मुख्यालयासह महापालिकेच्या दहा प्रभाग क्षेत्र कार्यालयात नागरीकांना पाहता येणार आहे.
त्याचबरोबर महापालिकेच्या वेबसाईटवर जाऊनही नागरीक यादी तपासू शकतात. मतदारांनी हरकत घेताना त्यांच्या नावात काही चूक झाली असल्यास तसेच ते राहतात. एका प्रभागात आणि त्यांचे नाव दुस:या प्रभागाच्या यादीत आले असेल तरत्याची हरकत नोंदवू शकतात. त्याचबरोबर विधानसभा निवडणूकीच्या मतदार यादीत त्यांचे नाव होते. मात्र महापालिका निवडणूकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत नाव नाही याची हरकत व सूचना ते नोंदवू शकतात.