शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

उकाड्याने हैराण डोंबिवलीकरांना रिमझिम पावसाने दिलासा, वातावरणात गारवा 

By अनिकेत घमंडी | Published: August 21, 2023 1:42 PM

रस्त्यांवर खड्डे, त्यातील खडी यामुळे अपघाताची भीती आणि त्यातून उडणारी धूळ त्यात उकाडा, घामेघुम वातावरण यांमुळे नागरिक हैराण झाले होते.

डोंबिवली: भर पावसाळ्यात पंधरा दिवसांपासून दमट हवामानात वाढ झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या डोंबिवलीकर नागरिकांना सोमवारी रिमझिम पावसाने सुरुवात केल्याने वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाल्याने दिलासा मिळाला.

रस्त्यांवर खड्डे, त्यातील खडी यामुळे अपघाताची भीती आणि त्यातून उडणारी धूळ त्यात उकाडा, घामेघुम वातावरण यांमुळे नागरिक हैराण झाले होते. शुक्रवारपासून आकाश ढगाळलेले होते, पण पावसाचा पत्ता नव्हता, त्यामुळे उष्णता अधिक वाढली होती. रविवारी हलक्या सरी पडल्या पण त्यामुळे धुळीचे प्रमाण जास्त वाढले, सोमवारी सकाळी जोरदार पावसाच्या सरींनी हजेरी लावली, आणि चाकरमान्यांची साडेआठ वाजता एकच त्रेधातिरपीट उडाली. त्यानंतर दुपारपर्यंत रिमझिम।पाऊस सुरू होता. त्यामुळे वातावरणात गारवा आला होता, आकाश पूर्णतः ढगाळलेले असल्याने जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.

सोमवार असल्याने मुख्य बाजारपेठ बंद असून पहिला श्रावणी सोमवार असल्याने भाजीबाजारात गर्दी झाली होती. सकाळी शाळेत जाताना आणि दुपारी शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यांनी पावसाचा आनन्द लुटला. दुकाने बंद असल्याने बाजारात गर्दी झालेली नव्हती, वाहतूक देखील सुरळीत सुरू होती. हवेतील सुखद गारवा असाच वाढू दे अशी अपेक्षा उष्म्याने त्रस्त नागरिकांनीकेली.

टॅग्स :dombivaliडोंबिवली