शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

जनाब, उर्दू किताबों से मिलीए, कुतुब बिनी का लुत्फ उठाइये, रील्स, वेबसाइटमुळे तरुणाईची उर्दू वाचनाकडे पाठ

By मुरलीधर भवार | Published: January 04, 2024 2:21 PM

विद्यार्थी, शिक्षक व संस्था यांनी वेगवेगळ्या रकमांची पुस्तके खरेदी केली तर प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान केला जाणार आहे.

कल्याण : इंग्रजी माध्यमांकडे वाढता कल आणि पुस्तके वाचण्यापेक्षा मोबाइलमध्ये रील्स, वेबसाइट पाहण्याकडे ओढा यामुळे मुंबईतील बीकेसी मैदानावर आयोजित २६व्या उर्दू बुक फेअरला वाचकांचा प्रतिसाद मिळेल किंवा कसे, अशी शंका आयोजकांना वाटत असल्याने ठाणे जिल्ह्यातील ज्या शहरांमध्ये उर्दू शाळा आहेत तेथे जाऊन बुक फेअरला येण्याबाबत जनजागृती करीत आहेत. विद्यार्थी, शिक्षक व संस्था यांनी वेगवेगळ्या रकमांची पुस्तके खरेदी केली तर प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान केला जाणार आहे.

नॅशनल कौन्सिल फॉर प्रमोशन ऑफ उर्दू लँग्वेज ही केंद्र सरकारची संस्था आहे. या संस्थेच्या पुढाकाराने देशभरात नॅशनल उर्दू बुक फेअरचे आयोजन केले जाते. २६वी नॅशनल उर्दू बुक फेअर मुंबईतील बीकेसी ग्राउंडवर आयोजित केली आहे. त्याचा शुभारंभ ६ जानेवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. ही बुक फेअर १४ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. या बुक फेअरमध्ये देशभरातील १८० उर्दू पुस्तक प्रकाशक सहभागी होणार आहेत. विविध विषयांवरील साडेतीन लाख उर्दू पुस्तके उर्दू भाषिकांना चाळता, पाहता आणि खरेदी करता येणार आहेत. याठिकाणी पुस्तकांच्या माध्यमातून मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाची  प्रतिकृती साकारली जाणार आहे. राज्यभरात उर्दू माध्यमाच्या तीन हजार ६०० शाळा आहेत. त्यातून लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 

उर्दू पुस्तक विक्रेत्यांसमोर समस्या कल्याणमधील नॅशनल उर्दू स्कूल ही मोठी शाळा आहे. या शाळेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. या बुक फेअरचे समन्वयक इम्तीयाज खलील यांच्यासह पासबान प्रकाशनचे संपादक शब्बीर शाकीर, प्रा. माजिद अन्सारी, मुख्याध्यापक अब्दुल्ला खान, सय्यद जाहिद आणि स्तंभलेखक एजाज अब्दुल गनी यांनी उर्दू नॅशनल स्कूलला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.  अभ्यासातील क्रमिक पुस्तकांव्यतिरिक्त विविध विषयावरील पुस्तके विद्यार्थ्यांनी वाचली पाहिजेत, याबाबत त्यांनी प्रबोधन केले. उर्दू शाळेत शिकणारी बहुतांश मुले-मुली सोशल मीडियावर सक्रिय आहेत. अवांतर वाचत नसल्याने मराठी भाषेतील ग्रंथव्यवहारासमोर जशी समस्या आहे तशीच ती उर्दू पुस्तक विक्रेत्यांसमोरही आहे.

पुस्तके खरेदी केल्यास प्रमाणपत्र मिळणारया पुस्तक प्रदर्शनास भेट देऊन विद्यार्थ्यांनी ५०० रुपयांची, शिक्षकांनी पाच हजार रुपयांची आणि संस्थांनी २५ हजार रुपयांची पुस्तके खरेदी केल्यास त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविले जाणार आहे. 

सहा ते १४ दरम्यान उर्दू साहित्यिक मेजवानीऑनलाइन शिक्षणातील समस्या, स्पर्धा परीक्षा, उर्दू भाषेतील पत्रकारिता, उर्दू भाषेची चळवळ, उर्दू कॅलिग्राफी आदी विषयांवर परिसंवाद, चर्चासत्र होणार आहेत. भाषेतील तज्ज्ञ त्याठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. विशेष म्हणजे, समारोपाच्या प्रसंगी आयोजित मुशायऱ्याला ख्यातनाम शायर  गुलजारस गझल गायक तलत अजिज व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

टॅग्स :kalyanकल्याण