- अनिकेत घमंडी डोंबिवली - यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गट आणि शिंदे गट हे शिवसेनेचे दोन ग आमने सामने येणार आहेत. येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यासमोर ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांनी आव्हान उभे केले आहे. दरम्यान, आज आदित्य ठाकरे यांचा डोंबिवली दौरा आटोपतो न आटोपतो तोच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शहरप्रमुख विवेक खामकर यांच्यासह ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
श्रीकांत शिंदे यांनी कोल्हापूर दौऱ्यावर असताना ठाकरे गटाला हा धक्का दिला आहे. ठाकरे गटातील हे सर्व पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यामध्ये होणाऱ्या कार्यक्रमामधून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
ठाकरे गटातून शिंदे गटापक्ष प्रवेश करणा-यांची नावे पुढील प्रमाणेविवेक खामकर -शहरप्रमुखकवीता गावंड - महिला जिल्हासंघटकलीना शिर्के - युवती सेना जिल्हाधिकारीकिरण मोंडकर - उपशहर संघटकराधिका गुप्ते - कल्याण पूर्व विधानसभा संघटकराजेंद्र नांदुस्कर -उपशहर संघटकश्याम चौगुले -विभाग प्रमुखसुधीर पवार -विभाग प्रमुखशिवराम हळदणकर -विभाग प्रमुखनरेंद्र खाडे -उपविभाग प्रमुखसतीश कुलकर्णी -उपविभाग प्रमुखप्रशांत शिंदे -उपविभाग प्रमुखप्रसाद चव्हाण -शाखाप्रमुखविष्णू पवार -शाखाप्रमुखमयूर जाधव -शाखाप्रमुख