डोंबिवली-एका आठ वर्षीय मुलीसोबत लैगिंग अत्याचाराची धक्कादायक घटना मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणात मानपाडा पोलिसांनी खाजगी शिक्षक अजितकुमार साहू याला अटक केली आहे. अजितकुमार साहू हा त्याच्या गावी उडिसाला पळून जाण्याच्या तयारीत होता. त्या आधीच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
कल्याण पूर्वेत एका परिसरात राहणारा शिक्षक अजितकुमार साहू जनरल ना’लेज या विषयाच कोचिंग क्लासेस घेतो. या कोचिंग क्लासमध्ये शिकणाऱ््या एका आठ वर्षीय मुलगी क्लासवरून घरी आल्यानंतर ती अस्वस्थ होती. तिची मानसिक स्थिती बघून तिच्या नातेवाईकांनी तिची विचारपूस केली. आधी तर मुलगी काही सांगण्याच्या मनस्थितीत नव्हती. मात्र तिला तिच्या नातेवाईकांनी विश्वासात घेतले आहे. तिने जे सांगितले ते ते ऐकून सर्वांना धक्काच बसला.
तिच्या सांगण्यानुसार तिच्यासोबत काही दिवसापासून गैरप्रकार सुरु होता. तिच्यावर लैगिंक अत्याचार केला जात होता. लैेंगिक अत्याचार करणारा दुसरा तिसरा कोणी नव्हता. तर ती ज्या ठिकाणी क्लासला जाते. त्याच क्लासचा शिक्षक तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत होता. मुलीने ही हकीगत सांगितल्यावर मुलीच्या नातेवाईकांनी मानपाडा पोलिस ठाण्यात धाव घेतली. मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशाेक होनमाने यांनी त्वरीत संबंधित शिक्षक अजितकुमार साहूला अटक करण्यासाठी पोलिस पाठविले.
पोलिस त्याच्या घरी पोहचले. त्यावेळी तो पळून जाण्याच्या तयारी होता. पोलिस अधिकारी सुनिल तारमळे यांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले. या प्रकरणात अजितकुमार साहूला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे आणि वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी निशा चव्हाण करीत आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.