शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

..तो  शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न; पण... ताकद दिल्यामुळेच एकनाथ शिंदेंचे धाडस - एकनाथ खडसे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 11:43 AM

कल्याण-डोंबिवली जिल्हा राष्ट्रवादी काॅंग्रेस व खान्देश ज्ञाती समाजातर्फे खडसे यांचा रविवारी सत्कार करण्यात आला.

कल्याण : सध्या जे राजकारण चालले आहे, तो  शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र, यामागे कोणती तरी मोठी शक्ती आहे. हे सगळे घडत आहे, त्यासाठी कुणी तरी ताकद दिल्याशिवाय एकनाथ शिंदे इतके धाडस करणार नाहीत. कोण त्यांच्या पाठीमागे आहे, हे भविष्यात समोर येईलच, असे सूचक विधान राष्ट्रवादीचे नेते व आमदार एकनाथ खडसे यांनी कल्याणमध्ये केले. कल्याण-डोंबिवली जिल्हा राष्ट्रवादी काॅंग्रेस व खान्देश ज्ञाती समाजातर्फे खडसे यांचा रविवारी सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत हाेते. ४० वर्षांत असे राजकारण मी अनुभवले नव्हते. राज्यात अस्थिरतेचे वातावरण आहे. कोण कुणाबरोबर आहे, यावर आता विश्वास ठेवता येणार नाही. महाराष्ट्राच्या मंत्रिमडळातील बहुसंख्य मंत्र्यांनी बंड केले आहे. शिवसेनेतून अनेक जण बाहेर पडत आहेत. अनेक तांत्रिक प्रश्न निर्माण झाले आहेत. पण तांत्रिक प्रश्नांची सोडवणूक न्यायालय करू शकेल, अशी स्थिती आहे, याकडे खडसे यांनी लक्ष वेधले. या सोहळ्यास समाजबांधव तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘अडचणीत शरद पवारांनी दिली साथ’प्रमाणिकपणे काम करून माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. राजकारण इतक्या खालच्या स्तराला जाते हे आयुष्यात पहिल्यांदा अनुभवले आहे. चौकशा झाल्या इथपर्यंत ठीक होते. नंतरच्या कालखंडात माझ्या कुटुंबाला त्रास दिला. मागच्या आठवड्यात माझ्या बँकखाते गाेठवून खात्यात एक रुपयाही ठेवलेला नाही. त्यानंतर राहते घर १० दिवसांत रिकामे करण्याची नोटीस आली. न्यायालयातून जाऊन स्टे आणला म्हणून त्या घरात राहत आहे. माझ्या हातात इतकी ताकद आणि शक्ती आहे की अनेकांना देशोधडीला लावू शकतो. पण असा विचार मी करत नाही. या सगळ्या अडचणीत शरद पवार यांनी साथ दिली. त्यांनी मदत केली नसती तर नाथाभाऊ होत्याचा  नव्हता झाला असता, असे खडसे सत्कारावेळी म्हणाले. 

 

 

 

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस