सचिन सागरे,कल्याण : बिर्ला कॉलेज, कल्याण आणि एका खासगी रूग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदाब, कॅल्शियम तपासणी, मधुमेह, ई.जी.सी. व डोळे आदी तपासण्या करण्यात आल्या. विविध तज्ञ डॉक्टरांनी सुमारे दोनशे नागरिकांची यावेळी तपासणी केली. कॉलेजच्या मायक्रोबायोलॉजी आणि डीएमएलटी विभागातर्फे दरवर्षी या प्रकारच्या चाचणी शिबिराचे आयोजन केले जाते.
या शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे शिक्षण संचालक डॉ. नरेश चंद्र, प्राचार्य डॉ. अविनाश पाटील आणि खासगी रुग्णालयाचे प्रख्यात डॉक्टर मीनू, विशाल आणि माधवी वरिक आदींच्या उपस्थितीत झाले. डॉ. नरेशचंद्र यांनी अशा तपासणी शिबिरांचे आयोजन आवश्यक व समर्पक असल्याचे सांगितले. प्राचार्य पाटील यांनी अशा कामांसाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
शिबिराचे आयोजक डॉ. धीरज शेखावत यांनी सर्व अभ्यागतांचे स्वागत केले व महाविद्यालयाच्या व्यवस्थापन यंत्रणा व रुग्णालयाकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमात उपप्राचार्य डॉ. मनिंदर धालीवाल, प्रा. रघुनाथ पाटील, डॉ. नारायण तोटेवाड, डॉ. शुभांगी चिटणीश, डॉ. शुभांगी राजगुरू, प्रा. किशोर देसाई यांच्यासह सिमरन, दीपक, प्रथमेश आदींचे विशेष सहकार्य लाभले.