कल्यान/डोम्बिवली - कोरोना संकटामुळे आर्थिक घडी कोलमडली असून अनेकांच्या हाताला काम नसल्यानं दोन वेळच्या जेवणाचीसुद्धा भ्रांत निर्माण झालीय. या पार्श्वभूमीवर कामा संघटना गेल्या अनेक दिवसांपासून कल्याण ग्रामीण परीसरातील गरजूंना जेवण पुरवत आहे. विशेष म्हणजे हा सर्व स्वयंपाक महिला बचत गटातील महिला बनवत असल्याने त्यांनासुद्धा रोजगार मिळाला आहे.
याच बरोबर मुरबाड परिसरातील अनेक आदिवासी पाड्यांमध्ये गारपीट झाल्याने येथील गावकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काहींचे घराचे पत्र उडून गेले व घरातील वस्तूंचेही नुकसान झाले. याची दखल घेत कामा संघटनेने या सर्व गावांमध्ये जाऊन धान्य वाटप केले. नाका कामगार असो वा इतर हातावर पोट असणार कष्टकरी असो, संघटनेच्या अन्नदानामुळे, अशा सर्व लोकांना काहीसा दिलासा मिळालाय. कठीण काळात उद्योजकानी मदतीचा हात पुढे केल्याने समाधान व्यक्त होत आहे.