कल्याण - राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाचे प्रदेश युवाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर एका गंभीर प्रकरणात गुन्हा दाखल आहे. त्यांना कल्याणमध्ये कार्यक्रमास हजर राहण्याची परवानगी देऊ नये असे पत्र भाजप युवा मोर्चाच्या वतीने महात्मा फुले पोलिस ठाण्यात पत्र देण्यात आले होते. शेख कल्याणमध्ये आले तर भाजप आंदोलन करणार असा इशाराही देण्यात आला होता. मात्र शेख कल्याणमध्ये आले. त्यांची सभाही चांगल्या प्रकारे झाले. त्यामुळे भाजपचा आंदोलनाचा इशारा फुसका ठरला आहे.कल्याण पश्चिमेतील भानूसागर सिनेमाजवल राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्नील रोकडे यांनी रोजगार मेळाव्याचे आयोजन आज सायंकाळी केले होते. या मेळाव्यास पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शेख हे उपस्थित राहणार असल्याचे बॅनर शहरात झळले होते. हा कार्यक्रम आज सायंकाळी असल्याने त्याआधी भाजप युवा मोर्चाने पोलिस ठाण्यात पत्र देऊन शेख हे कार्यक्रमास हजर कसे राहू शकतात. त्यांना जामीन मिळाला आहे. ते मेळावा कसे काय घेऊ शकतात असे प्रश्न उपस्थित करीत भाजपने हरकत घेतली. शेख मेळाव्यास हजर राहिल्यास आंदोलन करण्याचा इशारा भाजप युवा मोर्चाच्या वतीने दिला. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. शेख हे रोजगार मेळाव्यास उपस्थित राहिले. त्यावेली व्यासपीठावरुन अनेक वक्त्यांनी श्ेाख यांची बदनामी केली जात आहे. त्यांच्यावरील आरोप खोटा आहे. तसेच राष्ट्रवादी जिल्हा युवाध्यक्ष सुधीर वंडार पाटील यांनी ज्यांनी शेख यांच्या उपस्थितीस हरकत घेतली. त्यांनी समोर यावे. रस्त्यावर उतरावे. त्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकत्र्यानी चांगलाच धडा शिकविला असता असे आव्हान दिले.कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूका तोंडावर आहेत. त्या पाश्र्वभूमीवर विविध पक्षाचे मेळावे सुरु झाले आहेत. या मेळाव्यात शेख यांनी तरुणांना नगरसेवक पदाचे तिकट दिले जाईल असे व्यक्तव्य करीत महापालिकेत मागच्या वेळी राष्ट्रवादीचे दोनच नगरसेवक निवडून आले होते. आगामी निवडणूकीत २० नगरसेवक निवडून येतील असा दावा केला. पाया वाटा आणि गटारे यांची विकास कामे करण्याऐवजी विविध भरीव कामे केली जाणार आहे. त्यासाठी महाविकास आघाडीच्या तीन मंत्र्यांना फोन लावून त्यांना समस्या सोडविण्याचे सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर आगामी निवडणूकीत भाजप व मनसे यांची युती होईल का असा प्रश्न पत्रकारांनी शेख यांच्याकडे उपस्थीत केला असता त्यांनी भाजप कोणाशीही युती करु शकतो. त्याचा महाविकास आघाडीला काही एक फरक पडणार नाही.
..तरी देखील मेहबूब शेख कल्याणमध्ये आले, शेख यांच्यावर एका महिलेने केला होता बलात्काराचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2021 8:26 PM