लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याणमध्ये राहणारे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू अशोक प्रधान यांच्या घरात घुसून पाच जणांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी कुलगुरू प्रधान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ज्या व्यक्तीने प्रधान यांना मारहाण केली. तो एका शाळेत शिक्षक असून त्याच्या विरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई प्रधान यांच्यामुळे झाली असल्याचा संशय संबंधिताला आहे. त्यातून हा प्रकार घडला.
‘मारहाण करणाऱ्यांना सोडू नका’कुलगुरू प्रधान यांचे वय ८४ वर्षे आहे. त्यांनी रुपारेल महाविद्यालयात प्राचार्य आणि मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू पद भूषवले आहे. संजय भागवंत जाधव हा इसम त्यांच्या घरात शिरला. संदेश जाधव, आणि पाच जणांनी प्रधान यांच्या घरात प्रवेश करून त्यांना मारहाण केली. प्रधान यांनी घराबाहेर पडू नये यासाठी घराची कडी बाहेरून लावून घेतली होती. शिवसेना ठाकरे गटाचे नेते बाळ हसदास, शहर प्रमुख सचिन बासरे, प्रथमेश पुण्यार्थी यांनी प्रधान यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात, अशी मागणी केली.
चाकू आणि रिव्हाॅल्व्हरचाही दाखविला धाक n ठाकरे गटाच्या मते, प्रधान यांनी दिलेल्या तक्रार ही त्रोटक आहे. प्रधान यांना मारहाण करून चाकू आणि रिव्हाॅल्व्हरचा धाक दाखविला गेला. n मारहाण होत असताना प्रधान यांचा मोबाइल हिसकावून घेण्यात आला. जेणेकरून प्रधान यांनी पोलिसांना तक्रार करता येऊ नये. तसेच त्यांच्याकडे पैशाची मागणी केली गेली. n इतक्या मोठ्या व्यक्तीच्या बाबतीत असे प्रकार घडत असल्याने आम्हाला या शहरात राहण्याची लाज वाटते, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी पोलिसांकडे व्यक्त केली आहे.