कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांनी एका महिलीची प्रसूती करण्यास नकार दिला होता. या प्रकरणी आरोग्य खात्याच्या उपायुक्तांनी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना नोटिस काढली आहे. त्यांच्याकडून या प्रकरणी खुलासा मागविला आहे. त्यांच्याकडून काय खुलासा दिला जातो. त्यानंतर प्रशासनाकडून पुढील कारवाई केली जाणार आहे.
दावडी येथे राहणारी प्रिया शर्मा ही गरोदर असल्याने तिने प्रसूतीकरीता ३ महिन्यापूर्वीच डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णलायात नाव नोंदणी केली होती. तिला प्रसूतीच्या वेदना सुरु झाल्याने तिच्या वडिलांनी तिला शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले. तिची चाचणी केली गेली. तिची प्रकृती प्रसूतीसाठी योग्य नसल्याने तिची प्सूती करणे योग्य ठरणार नाही. ही गंभीर बाब असल्याचे सांगितले. तिला पुढील उपचारासाठी मुंबईतील शीव रुग्णलायत न्या असे सांगितले. तिच्या वडिलांनी मुलीला प्रसूतीकरीता मुंबईतील शीव रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी तिची प्रसूती विना शस्त्रक्रिया नैसर्गिकरित्या झाली. तिची प्रकृती गंभीर नसल्यानाना रुग्णालयातील डॉक्टरांनी अशा प्रकारे थाप मारल्याची बाब या घटनेतून उघड झाली.
या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील यांनी महिलेची प्रसूती करण्याास नकार देणाऱ््यां डॉक्टरांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती. मात्र सुरुवातीला प्रशासनाकडून या प्रकरणी मौन बाळगले गेले असले तरी आत्ता आरोग्य खात्याचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी शास्त्रीनगर रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक दीपा शुक्ला यांना नोटिस काढली आहे. महिलेच्या प्रसूती करण्यास का नकार दिला गेला. त्याबाबत खुलासा करण्यात यावा असे म्हटले आहे. त्यांच्याकडून काय खुलासा प्राप्त होतो. त्यानंतर प्रशासनाकडून पुढील कारवाई केली जाईल. मात्र सामाजिक कार्यकर्ते पाटील यांनी सांगितले की, केवळ कारणे दाखवा नोटिस बजावून खुलासा घेऊन काम भागणार नाही. तर हा प्रकार त्या महिलेसह तिच्या पोटात असलेल्या बाळाच्या जिविताशी खेळण्याचा होता. त्यामुळे त्याला जबाबदार असलेल्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली पाहिजे अशी आमची मागणी आहे.