डोंबिवली: मध्य रेल्वेच्या आंबिवली स्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणेची केबल चोरीला गेल्याची घटना शुक्रवारी रात्री चोरण्याचा प्रयत्न झाला, त्यात ती केबल तोडण्यात आली, त ते शनिवारी सकाळी उघडकीस आल्याने कल्याण ते आसनगाव रेल्वे मार्गवरील दुतर्फा रेल्वे वाहतूक सकाळी ६.३० ते ७ वाज्जेदरम्यान ठप्प झाली होती. त्या घटनेमुळे मध्य रेल्वेची लांबपल्याच्या गाड्यांसह उपनगरी लोकल सेवेचे वेळापत्रक सपशेल कोलमडले.
आसनगाव कल्याण अप डाऊन मार्गावरील बहुतांशी स्थानकांमध्ये या घटनेमुळे तोबा गर्दी झाली होती. कल्याण कसारा रेल्वे पॅसेंजर असोसिएशनचे सचिव उमेश विशे यांनी त्याबाबत माहिती देताना सांगितले की, काही वर्षांपूर्वी अशी केबल चोरीला गेल्याची घटना घडली होती, केबल चोरल्याने सिग्नल यंत्रणा पूर्ण ठप्प झाली, त्यामुळे वाहतुकीवर परिणाम।झाला. टिटवाळा ते आसनगाव मार्गावर सगळ्या स्थानकात लांबपल्याच्या गाड्या खोळंबल्या होत्या. त्यामुळे उपनगरी लोकल वाहतुक देखील कोलमडली आणि त्याचा त्रास प्रवाशांना झाला. आसनगाव स्थानकातून एरव्ही सकाळी ८.४० मिनिटांनी ठाण्याला जाणारी लोकल ९ वाजले होते तरीही न आल्याने त्या दरम्यान असलेल्या सर्व लोकल सेवेवर त्याचा परिणाम झाला.
याबाबत आरपीएफ अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही घटना शुक्रवारी रात्री घडली असून सिग्नल यंत्रणेची केबल तोडून बाजूला टाकण्यात आली होती, ती मिळाली आहे, अशा पद्धतीने केबल चोरण्याचा प्रयत्न झाला होता. पण आता आतालोकल, लांबपल्याची वाहतूक सुरू आहे.