शहरं
Join us  
Trending Stories
1
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
2
आजचे राशीभविष्य: ३ राशींना अनुकूल, आर्थिक लाभ संभवतात; सुखाचा, शांततेचा दिवस
3
मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात
4
ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर
5
१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू
6
भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच!
7
विधानसभा निवडणूक: पोलिसांच्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर दहा कोटींची चांदी जप्त
8
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा
9
राजकारणातील सर्वच पुतण्यांचा DNA एकसारखाच, अडचणीत आणाल तर...- छगन भुजबळ
10
राहुल नार्वेकरांच्या मालमत्तेत चार कोटींची वाढ; पाच वर्षात आशिष शेलारांची संपत्तीत किती वाढली?
11
रांगोळीवरही निवडणुकीचा रंग! पालघरमधील सफाळेत मतदान जनजागृतीचे अनोखे आवाहन
12
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
13
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
14
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
15
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
16
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
17
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
18
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
19
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
20
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी

मैदानात महोत्सव होऊच देणार नाही; डोंबिवलीकरांनी दिला उपोषणाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2022 3:36 PM

खेळाडूंनीही व्यक्त केली नाराजी. डोंबिवली पश्चिमेला एकमेव असे  कान्होजी जेधे (भागशाळा) मैदान आहे.  या मैदानात मुलं नेहमीच विविध खेळाचा आनंद घेत असतात.

कमत न्यूज नेटवर्क : डोंबिवली 

डोंबिवलीमधील नागरिक अचानक पश्चिमेकडील भागशाळा मैदानात जमा झाले...नागरिकांनी यावेळी संताप व्यक्त केला...वेळ पडली तर उपोषणाला बसू असा इशाराही देण्यात आला...याच कारण म्हणजे मैदानात चालणारे महोत्सव...आता पुन्हा या  मैदानात एका महोत्सवाला परवानगी देण्यात आल्याचं नागरिकांकडून सांगण्यात आलय...20 ते 22 दिवस असे महोत्सव सुरू  राहिले तर खेळाडूंनी खेळायचं कुठे असा सवाल उपस्थित करण्यात आलाय..इतकंच नाही तर  त्वरित महोत्सव रद्द करावे अन्यथा मैदानातच उपोषणाला बसू असा इशाराही देण्यात आलाय...खेळाडू नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांनी एकत्र येत  आपली भूमिका व्यक्त केलीये..या मैदानाच्या बाहेर नागरिकांनी सह्यांची मोहीम देखील राबवली आहे.       डोंबिवली पश्चिमेला एकमेव असे  कान्होजी जेधे (भागशाळा) मैदान आहे.  या मैदानात मुलं नेहमीच विविध खेळाचा आनंद घेत असतात..सध्या शाळांना देखील सुट्टी आहे..अशातच या मैदानावर एक महोत्सव आयोजित करण्यात आलाय..त्याची तयारी देखील सुरू झाली. आयोजकांनी पालिका प्रशासनाकडून महोत्सवासाठी परवानगी मिळवली आहे. सांस्कृतिक कार्यक्रमासाठी परवानगी देण्यास हरकत नाही मात्र 15 दिवसांपेक्षा  एखाद्या महोत्सवाला परवानगी देत खेळाडूंची अडवणूक करणं योग्य नाही अशी भूमिका  भाजपाचे पदाधिकारी राजेश म्हात्रे यांनी मांडलीये..मैदान हे खेळासाठी आहे त्याच साधन उत्पन्नाचं स्रोत म्हणून करू नये असं मत मॉर्निंग क्रिकेट क्लबचे सदस्य तुषार भोईर यांनी मांडलंय.याच मैदानात फटके विक्रीस मनाई केल्याने फटके विक्री करणारे नाराज झाले होते. मात्र याच मैदानात महोत्सव भरविण्यास पालिका प्रशासनाकडून परवानगी कशी दिली जाते ? याबाबत देखील आश्चर्य व्यक्त होत आहे.  मनसेचे पदाधिकारी प्रल्हाद म्हात्रे हे स्वखर्चाने मैदानाची निगा राखत असून मैदानात महोत्सव पाहिजेच कशाला? असा सवाल उपस्थित करत त्यांनीही याचा निषेध व्यक्त केला.

१९४७-४८ सुमारास सर्व सरकारी कर्मचारी ज्यात माजी जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी होते त्यांनी मिळून डोंबिवली पश्चिमेला एक सोसायटी स्थापन केले. त्यावेळी काही एकर जमीन सरकारी दरात विकत घेतली. यात अडीच एकर जमीन खेळाचे मैदान म्हणून राखीव ठेवले होते.काही काळाने या मैदानाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेवर आली.आतापर्यंत खेळासाठीच या मैदानाचा वापर झाला अशी माहिती स्थानिक नागरिक मंगेश हरणे यांनी दिली...याआधी या मैदानावर अतिक्रमणाचा प्रयत्न झाला पण तो सफल झाला नाही. स्थानिक नागरिकांनी हे मैदान राखून ठेवले.आता महोत्सवाच्या नावाखाली बाजरीकरण सुरु आहे.वर्षातून दोन ते तीन वेळेला महोत्सव, उत्सव किंवा सांस्कृतिक कार्यक्रमास दिले जाते.नागरिकांच्या भावना समजून घेत प्रशासनाने महोत्सवाला परवानगी देऊ नये अशी विनंती देखील हरणे यांनी केली.

टॅग्स :dombivaliडोंबिवली