कल्याण : कोरोनाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने कठोर पाऊले उचलण्यास सुरवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून मास्क परिधान न करता वावरणाऱ्या नागरिकांवर पालिका कारवाई करत असून गेळ्या दहा दिवसांत पालिकेने सुमारे 4 लाख दंड वसूल केला आहे.
काही नागरिक रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी फिरतांना मास्क न घालत फिरत असल्याचे दिसून येत आहे. घराबाहेर फिरतांना विना मास्क वा कापड परिधान न करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध दंडाची कारवाई महापालिकेने जोमाने सुरू ठेवली आहे.
15 मार्च ते 24 मार्च या कालावधी दरम्यान मास्क न परिधान करणाऱ्या 791 व्यक्तींकडून 3 लाख 95 हजार 400 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. नागरिकांनी घराबाहेर, सार्वजनिक ठिकाणी अथवा गर्दीच्या ठिकाणी वावरतांना मास्क परिधान करण्याची दक्षता घ्यावी, असे आवाहन महानगरपालिकेमार्फत करण्यात आले आहे.