मुरलीधर भवार- कल्याण-शहराच्या पूर्व भागातील नेतिवली टेकडीवरील पाच घरे कोसळल्याची घटना आज दुपारी घडली. घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत जिवीत हानी झालेली नाही. टेकडीवरील तीन घरे दोन घरांवर कोसळली. गेल्या आठवडाभरात सुरु असलेल्या पावसामुळे टेकडीवरील माती पावसामुळे खचत आहे. त्याचाच परिमाण म्हणून टेकडीवरील पाच घरे कोसळल्याची घटना घडली आहे.
या टेकडीवर राहणारे रहिवासी अनंत पवार यांच्या घरांना तडे गेले होते. तडे गेलेल्या भिंती कोसळल्या. टेकडीवरील उताराला असलेल्या तीन घरांच्या खाली असलेल्या दोन घरांवर ही घरे कोसळली. ज्या घरांवर ही तीन घरे कोसळी. त्या दोन घरांपैकी एका घरात एक महिला होती. ती किरकाेळ जखमी झाली आहे. कोसळलेल्या अन्य चार घरांमध्ये कोणीही नव्हते. घराती मंडळी कामानिमित्त बाहेर गेली होती. त्यामुळे ती बचावली आहेत. तीन दिवसापूर्वी पावसामुळे कचोरे टेकडीचा काही भाग कोसळून भला मोठा दगड घरंगळत टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या घराजवळ येऊन थबकला होता. त्याठिकाणीही जिवीत हानी झालेली नव्हती.
मात्र कचोरे, नेतिवली या टेकडी परिसरातील १४० नागरीकांना घरे खाली करण्याच्या नाेटिसा महापालिका प्रशासनाकडून यापूर्वीच बजावण्यात आल्या आहेत. त्यांच्या राहण्याची पर्याची व्यवस्था महापालिकेच्या शाळेत केली आहे. पावसाचा जाेर जास्त झाला की, काही लोक तात्पुर्तया स्वरुपात त्याठिकाणी काही वेळेपूरते जातात. पावसाचा जोर आेसरला की, पुन्हा टेकडीवरील घरांमध्येच जाऊन राहतात. त्यांनी पावसाळयात टेकडीवरील घरे सोडावी असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले असले तरी त्याला नागरीकांकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही. नागरीक जीव मुठीत घेऊनच टेकडीवरील घरात राहणे पंसत करतात. पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या आणि घरे पडण्याच्या घटना घडत असल्याने टेकडीवर राहणाऱ््या रहिवासीयांच्या जिवीतास धोका संभवतो.