डोंबिवली: गुढीपाडव्यानिमित्त निघणारी नववर्षस्वागत यात्र गेली दोन वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली होती. गुढीपाडवा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. कोरोनाच्या नव्या रूग्णांमध्ये कमालीची घट झाली असलीतरी संक्रमण रोखण्यासाठी घालण्यात आलेले र्निबध पुर्णपणो उठलेले नाहीत. त्यामुळे यावर्षीही स्वागतयात्र होणार नाही असे संकेत मिळत आहेत. याला श्री गणोश मंदिर संस्थानाचे अध्यक्ष राहुल दामले यांनीही दुजोरा दिला असून धार्मिक कार्यक्रमांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे सांगताना त्यावेळच्या परिस्थितीनुसार निर्णय घेऊ असे त्यांनी स्पष्ट केले.
गुढीपाडव्याला नववर्षदिनाचे औचित्य साधत राज्यात सर्वत्र दरवर्षी नववर्ष स्वागत यात्र काढली जाते. या स्वागत अर्थात शोभा यात्रेची सुरूवात सर्वप्रथम डोंबिवलीमधून झाली. डोंबिवलीतील श्री गणोश मंदिर संस्थानाच्या पुढाकारातून साजरा होण्या-या या उपक्रमाचे यंदा 23 वे वर्षे आहे. परंतू गेली दोन वर्षे कोरोनाच्या सावटामुळे स्वागतयात्र निघाली नव्हती ती रद्द करण्यात आली होती. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव नाही. सुदैवाने तिसरी लाट देखील पुर्णपणो ओसरली आहे. 2 एप्रिलला गुढीपाडवा आहे. त्यामुळे कोरोनामुळे खंडीत झालेली स्वागतयात्र धुमधडाक्यात निघेल अशी आशा होती. परंतू कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी लादलेले र्निबध मात्र पुर्णपणो उठविलेले नाहीत.
सामाजिक, क्रिडा, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय, सण-उत्सव यासंबंधित कार्यक्रमांना 50 टकके उपस्थितीचे बंधन घालण्यात आले आहे. जर एक हजार पेक्षा जास्त व्यक्तींची उपस्थिती राहणार असल्यास जिल्हा आपत्ती प्राधिकरणाला पूर्व कल्पना दयावी लागणार आहे. दरम्यान स्वागतयात्रेला मोठया संख्येने डोंबिवलीकर सहभागी होतात. त्यामुळे संबंधित अटी-शर्थी पाहता नववर्षानिमित्त केल्या जाणा-या सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर मर्यादा कायम राहील्या आहेत.
र्निबधात शिथिलता नाही-
कोरोनाची तिसरी लाट ओसरली असलीतरी र्निबधात शिथिलता आणली गेली आहे अशा कोणत्याही मार्गदर्शक सूचना आम्हाला प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे यंदाची परिस्थिती देखील जैसे थे राहील - सचिन सांडभोर वरीष्ठ पोलिस निरिक्षक रामनगर
‘त्या’ उत्साहाला मुकणार-
स्वागतयात्रेत ढोल पथकाची कला बघण्यासाठी फडके रोडच्या दुतर्फा मोठी गर्दी होते. स्वागतयात्रेला मर्यादा आल्या असल्यातरी तरूणाई गर्दी करणार यात शंका नाही परंतू स्वागतयात्रेतल्या उत्साह आणि आनंदाला तरूणाई सलग तिस-या वर्षी मुकणार आहे.