मयुरी चव्हाण
डोंबिवली - भोपर परिसरात पहाटे पाच वाजेच्या सुमारास एका घरात अचानक लागलेल्या आगीमुळे चार जण गंभीर जखमी झाले आहेत. यात आईसह दोन मुलींची प्रकृती चिंताजनक आहे. पहाटे ५ वाजता ही घटना घडल्याचं पोलिसांनी माहिती दिली. आगीच्या कारणाचा शोध सुरू असून जखमींवर एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रसाद पाटील , प्रीती पाटील वाणी 14 वर्षीय समीरा व 11 वर्षीय समीक्षा असे या चारही जखमींचे नाव असून यात आई सह दोन मुलींची प्रकृती चिंताजनक असून चौघांचाही उपचार डोंबिवलीतील खासगी रुग्णालयात सुरू आहे सध्या पोलीस व अग्निशामक दलाची टीम घटनास्थळी दाखल झाली असून ही आग कशी लागली याचा शोध घेत आहे
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"