अनिकेत घमंडी, डोंबिवली: दिवा रेल्वे स्थानकात रेल्वेचा टीसी असल्याचे भासवून लोकल गाड्यात डोंबिवली कोपर दिवा मार्गावर प्रवाशांची दिशाभूल करून अवैध दंड आकारणार्या तोतया टीसीसंदर्भात स्थानक प्रबंधक कार्यालयात तक्रार आल्याची घटना गुरुवारी घडली, त्यानुसार एका संशयिताची चौकशी करून तो तोतया असल्याचे स्पष्ट झाल्यावर आधी ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून रात्री तो डोंबिवलीत वर्ग करून त्या तोतया इसमाला अटक केली. दिवा स्थानक प्रबंधकांनी रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणेला दिलेल्या माहितीनंतर हा सगळा बनावट प्रकार उघडकीस आला.
त्यानूसार पोलिसांनी विजय बहादूर सिंह,(२१) रा. गणेशनगर ऐरोली, नवी मुंबई मूळ पत्ता जौनपूर, यूपी याची दिवा स्थानकातील हेड कॉन्स्टेबलने यांनी प्राथमिक चौकशी केली. तसेच मुख्य तिकीट निरीक्षक, मुंबई प्रमोद एच सरगईया यांच्याशी चर्चा करून माहिती घेतल्यावर खातरजमा करून तो सिंह तोतया असल्याचे सांगण्यात आले. त्याच्याकडे टीसीचे बनावट आयकार्ड देखील आढळून आले. त्यानूसार त्याची लोहमार्ग पोलीस उपनिरीक्षक शंकर पाटील यांनी कसून चौकशी केली, त्याला ताब्यात घेऊन ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात नेले. तेथे त्याच्यावर गुन्हा नोंदवून डोंबिवली हद्दीत घटना घडली असल्याने गुन्हा वर्ग करून त्याला पुढील चौकशीसाठी गुरुवारी रात्री तेथे पाठवण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकार्यांनी दिली. तो तोतया टीसीसंदर्भातील गुन्हा ठाणे लोहमार्ग पोलिसांनी डोंबिवली ते दिवा मार्गावरील।लोकलमध्ये घडल्याने डोंबिवली लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग केला असून त्याला गुरुवारी रात्री अटक।केली असून शुक्रवारी रेल्वे न्यायालयात पाठवण्यात येणार आहे : अर्चना दुसाने, वरिष्ठ।पोलीस निरीक्षक, डोंबिवली लोहमार्ग पोलीस