डोंबिवली : मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा मनसेचे आमदार राजू पाटील यांच्यावतीने मोफत लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये दोन हजार महाराष्ट्र सैनिकांसह मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे मोफत लसीकरण करण्यात आले.
मनसेचे आमदार राजू पाटील यांच्यावतीने कल्याण डोंबिवली तसेच दिव्यातील रिक्षा चालक, नाभिक, पत्रकार, जिम चालक यांचे सर्वात पहिले स्वखर्चाने लसीकरण केले. यानंतर आता मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत मनसेचे आमदार राजू पाटील यांच्यावतीने 2000 मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे मोफत लसीकरण शनिवार आणि रविवारी संपन्न झाले.या शिबिरात कल्याण पूर्व, डोंबिवली, ग्रामीण, दिवा , शीळ आणि १४ गावातील कार्यकर्त्यांचे लसीकरण करून घेतले आहे. एकीकडे सत्ताधारी हे लसीकरणाचे शुल्क आकारून लस देत आहेत. मात्र मनसेचे एकमेव आमदार कार्यकर्त्यांची काळजी घेत मोफत लस देऊन आपले कार्य पार पाडत आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे डोंबिवली अध्यक्ष मिलिंद म्हात्रे यांनी सांगितले की राजू दादांनी हा उपक्रम सर्वाना मोफत लस मिळावी म्हणून राबवला आहे.गेले दिड वर्ष पासून कोरोना महामारीत महाराष्ट्र सैनिक, कार्यकर्ते सेवा करत होते, हे सर्वांनी पाहिल आहे. त्यामुळे आपला कार्यकर्ता ,महाराष्ट्र सैनीक सुरक्षित झाले पाहिजे त्याच्यासाठी राजू दादानी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून २००० पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मोफत लसीकरण केलं आहे.आपल्या वडीलांसारखा जपणारा नेता आहे.