कल्याण-कल्याण परिसरातील पर्यटनाला बळ मिळणा आहे. पर्यटनासाठी २८ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. दावडी येथील पक्षी अभयाराण्य, मलंग गड परिसर सुशोभिकरण आणि पावशेपाडा तलाव आणि शिवमंदिर स्थळांसाठी हा निधी उपलब्ध झाला आहे. त्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून हा निधी प्राप्त झाला आहे.
खासदार शिंदे यांच्या पाठपुराव्यानंतर पर्यटन विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या निधीला मंजूरी दिली आहे. डोंबिवली येथील दावडी डोंगरावर पक्षी अभयारण्य आणि जैवविविधता उद्यान विकसीत करण्यासाठी पाच कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. पर्यटन स्थळे विकसीत करण्यासाठी खासदार शिंदे प्रयत्नशील होते. गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या श्रीमलंग गड या धार्मिक आणि पर्यटन स्थळाचकडे खासदार डॉ. शिंदे यांनी प्राधान्याने लक्ष दिले. येथे असलेले पाण्याचे दुर्भिक्ष्य संपवण्यासाठी त्यांनी पाणी योजना राबवण्यास सुरूवात केली. श्रीमलंग गडाचा पर्यटन विकासाअंतर्गत चेहरा मोहरा बदलण्यासाठी त्यांनी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडे निधीची मागणी केली होती. त्यानुसार श्री मलंगगडाच्या पर्यटनाच्या अंगाने विकास करण्यासाठी १० कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे.
यात गडाकडे जाणाऱ्या पायऱ्या, येथे संरक्षक कठडे यांची उभारणी केली जाते आहे. या पायऱ्या काळ्या दगडात बांधल्या जात आहेत. त्याचे काम प्रगतीपथावर आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील दुर्गाडी स्थळाच्या विकासासाठी ५ कोटी रूपयांचा निधी खासदार शिंदे यांनी पाठपुराव्याने प्राप्त केला. तर मतदारसंघातील पावशेपाडा आणि कांबा येथील तलाव आणि शिव मंदिराच्या परिसर सुशोभिकरणासाठी तब्बल ८ कोटींची निधी उपलब्ध करण्यात आला आहे. कोणत्या कामासाठी किती निधी
श्री मलंग वाडी परिसर सुशोभीकरण करणे - १० कोटी रुपयेकांबा तलावाचे सुशोभीकरण करणे तालुका - ५ कोटी रुपयेदुर्गाडी किल्ल्याचे डागडूजी करणे- ५ कोटी रुपयेकांबा शिवमंदिर परिसर सुशोभिकरण-३ कोटी रुपयेदावडी येथील पक्षी अभयारण्याचे सुशोभिकरण - ५ कोटी रुपये