डोंबिवली : रेल्वे प्रवासात आई मुलाची चुकामुक झाल्याची घटना मंगळवारी डोंबिवली रेल्वे स्थानकात घडली. प्रसंगावधान राखून आरपीएफ, लोहमार्ग पोलीसांनी त्या माय लोकांची भेट घडवून दिली. त्यामुळे खाकी वर्दीचा एक चांगला अनुभव प्रवाशांनी अनुभवला. त्या संदर्भात डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंदरे यांनी सांगितले की, मुस्तफा अली रजा (०३) हा डोंबिवली रेल्वे स्टेशन फलाट क्रमांक २ वर पालकांशिवाय असल्याचे रेल्वे पोलीस दलाच्या जवानांना आढळून आला.
त्यानुसार अरपीएफचे पोलीस निरीक्षक मनोहर यांनी त्यास लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणले, त्याला धीर देऊन बोलते।केले. त्याची आपुलकीने विचारपूस केली असता, तो लहान असल्याने त्यास काही सांगता आलेले नाही. त्यामुळे पोलिसांनी अन्य पर्यायाने त्याच्या पालकांचा शोध घेण्याचा प्रयत्न।केला. त्यात त्यांना यश आले, विविध अनुषंगाने माहिती घेऊन पालकाचा शोध घेऊन त्या मुलाची आई इशरत परवीन अली रजा (३७) रा. मुंब्रा यांना पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले. त्यानुसार त्यांच्याशी चर्चा करून त्यांची मुलाबाबत माहिती घेतली, आई मुलगा डोंबिवलीत कसा आला, त्याबाबत आईने सर्व माहिती पोलिसांना।दिली, ती माहिती पोलिसांनी दिली नाही.
त्यांचे आधारकार्ड तपासून खात्री करून मुस्तफा यास आईच्या ताब्यात दिले. मुलानेही आईला ओळखून लगेच मिठी मारली, आणि आनंद व्यक्त।केला. मुलगा।सुखरूप मिळाल्याने आईने समाधान व्यक्त।केले, लोहमार्ग पोलीस, अरपीएफ जवान या सगळ्यांचे आभार मानल्याचे उंदरे म्हणाले. वरिष्ठांनी देखील पोलिसांचे या कामगिरीबद्दल कौतुक केले.