डोंबिवली - जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिनानिमित्त महापालिका मुख्यालयात त्यांच्या प्रतिमेस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यावेळी उपायुक्त धैर्यशील जाधव, विभागप्रमुख संजय जाधव, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, उपअभियंता आदिनाथ पोखरकर, सहा.सुरक्षा अधिकारी सुरेश पवार तसेच महापालिका कर्मचारी वर्ग यांनी देखील त्यांच्या प्रतिमेस पुष्पसुमने अर्पण करुन अभिवादन केले.
त्यानंतर पारनाका, कल्याण पश्चिम येथे असलेल्या स्वामी विवेकानंदांच्या पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. डोंबिवली येथील महापालिकेच्या जुन्या विभागीय कार्यालयाजवळील स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्यास परिमंडळ२ चे उपआयुक्त अवधुत तावडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यावेळी डोंबिवली विभागीय कार्यालयातील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. याचनिमित्ताने शहरात दत्ता मालेकर यांनी इंदिरा गांधी चौकात त्यांच्या मराठवाडा विदर्भ रहिवासी संस्थेमार्फत मा जिजाऊ जन्मोत्सव।सोहळा केला. तसेच राष्ट्रपुरुष स्मृती जनजागरण समितीच्या माध्यमातून विवेकानंद, जिजाऊ यांना अभिवादन करण्यात आले.