शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा सर्वाधिक वापर कल्याण-डोंबिवलीतील रुग्णालयांत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 9:32 AM

आयसीएमआरच्या मार्गदर्शनानुसार कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर अवघा २५ ते ३० टक्के रुग्णांसाठी करणे अपेक्षित आहे. मात्र, जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये हे प्रमाण ९० टक्के असल्याचे निदर्शनास आले आहे.

सुरेश लोखंडे - ठाणे : रुग्णांसाठी रेमडेसिविर इंजेक्शनच्या मनमानी वापरामुळे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांमध्ये आधीच चिंता व्यक्त केली जात असताना, जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांकडून रेमडेसिविर इंजेक्शनचा जवळपास  ९० टक्के वापर‌ केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये जिल्ह्यातील अन्य शहरांंच्या तुलनेत कल्याण - डोंबिवली महापालिका क्षेत्रातील सर्वाधिक ७२ रुग्णालयांचा समावेश असल्याचे अहवालाअंती उघड झाले आहे.आयसीएमआरच्या मार्गदर्शनानुसार कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर अवघा २५ ते ३० टक्के रुग्णांसाठी करणे अपेक्षित आहे. मात्र, जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये हे प्रमाण ९० टक्के असल्याचे निदर्शनास आले आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये नियमास अनुसरून २५ तर ३० टक्के रुग्णांसाठीच रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर होत आहे. या इंजेक्शन्सच्या मनमानी वापरामुळे जिल्ह्यात रेमडेसिविरचा तुटवडा झाला. मात्र, आता रुग्णवाढीचे व रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण जिल्ह्यात कमी झाल्यामुळे या औषधींचा पुरवठाही सुरळीत होत असल्याचे अन्न व औषध विभागाचे सहआयुक्त पी.बी. मुंदडा यांनी ‘लोकमत’ला सांगितले.आयसीएमआरच्या निकषास अनुसरून जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा मागणीच्या तुलनेत ५० टक्के पुरवठा नेहमीप्रमाणे होत असल्याचेही मुंदडा यांनी सांगितले. जिल्हाभरातील रुग्णालयांनी आतापर्यंत एक लाख एक हजार ७२० रेमडेसिविरची मागणी नोंदवलेली आहे. त्यातुलनेत ५१ हजार‌ ६८५ इंजेक्शन मेडिकलऐवजी सरळ रुग्णालयांना पुरवण्यात आले आहेत. यातील २ हजार २६० इंजेक्शनचा २२६ रुग्णालयांना शुक्रवारी पुरवठा झाला आहे. यामध्ये सर्वाधिक इंजेक्शन्स कल्याण - डोंबिवली शहरातील ७२ रुग्णालयांना पुरवण्यात आले आहेत. या शहरांमधून ५ मेपर्यंत ३२ हजार २७८ इंजेक्शनची मागणी नोंदवली असून, जिल्ह्यात सर्वात जास्त तब्बल १४ हजार ६६९ इंजेक्शनच्या पुरवठा या शहरात झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये ६ ते ८ मेच्या पुरवठ्याचा समावेश केल्यानंतरही या शहरात सर्वाधिक रेमडेसिविरचा वापर होत असल्याचे उघड होत आहे.

नवी मुंबई- मीरा भाईंदर द्वितीय-तृतीय क्रमांकावरकल्याण-डोंबिवलीच्या खालोखाल गेल्या २० दिवसांत नवी मुंबईतील २९ रुग्णालयांनी ८ हजार ८२८ इंजेक्शनचा वापर केला आहे. त्यांनी १९ हजार ७४९ इंजेक्शनची मागणी केली होती. जिल्ह्यात रेमडेसिविरचा वापर करणाऱ्या शहरांमध्ये तृतीय क्रमांकाचे शहर म्हणून मीरा भाईंदर समोर आले आहे. या शहरातील ३२ रुग्णालयांनी ११ हजार ६१५ इंजेक्शनची मागणी केलेली आहे. त्यापैकी त्यांना ४ हजार ९७७ इंजेक्शनचा पुरवठा झाला आहे. या तुलनेत ठाणे मनपाच्या कार्यक्षेत्रातील ३५ रुग्णालयांनी ४ हजार २६४ इंजेक्शनची मागणी नोंदली असता त्यांना १ हजार ७७५ इंजेक्शनचा पुरवठा झाला आहे.

नातेवाइकांचा आग्रह - डाॅ. ओक टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रिटिंग या पद्धतीने कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले आहे. पण आजही आरटीपीसीआर निगेटिव्ह आल्याशिवाय रुग्णाला सुटी दिली जात नाही, अशी खंत कोरोनाच्या राज्य टास्क फोर्सचे प्रमुख डाॅ. संजय ओक यांनी व्यक्त केली. रेमडेसिविरच्या अतिवापराबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिविरचा आग्रह धरू लागले आहेत. त्यांचा रोष ओढावून घेण्याऐवजी रेमडेसिविर लावणे डाॅक्टर पसंत करीत असल्याचे वास्तव डाॅ. ओक यांनी मांडले. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याthaneठाणेdoctorडॉक्टर