कल्याण: कल्याणडोंबिवली महानगरपालिका हद्दीत मंगळवारी व्यापाऱ्यांनी दुकान बंदच्या आदेशाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली होती. मात्र संध्याकाळी व्यापारी वर्ग रस्त्यावर उतरला.
मानवी साखळी तयार करून राज्य सरकारच्या आदेशाचा व्यापा-यांनी तीव्र निषेध केला. या निर्णयामुळे आमच्यासह दुकानातील कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याचे यावेळी व्यापा-यांनी सांगितले.