कल्याण- मराठी पाट्यासंदर्भात कल्याण डोंबिवली मधील मनसे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज माजी आमदार व शहर अध्यक्ष प्रकाश भोईर, जिल्हाप्रमुख उल्हास भोईर ,महिला शहराध्यक्ष कस्तुरी देसाई यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने महापालिका आणि कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांची भेट घेतली. बहुतांश दुकानांवर अद्यापही मराठी पाट्या नाहीत. कारवाई कधी करणार असा सवाल विचारला. 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन आहे. तोपर्यंत कारवाई झाली नाही तर तोडफोड करण्यात येईल. त्याची सुरुवात महापालिका आणि कामगार सहाय्यक आयुक्त कार्यल्यापासून करु. त्यानंतर दुकाने फोडू असा इशारा यावेळी मनसेने दिला आहे.
न्यायालयाच्या आदेशानंतर ही कल्याण शहरात बहुतांश दुकानांवर इंग्रजी पाट्या आहेत. मराठी पाटणबाबतची कारवाई ही कामगार आयुक्त कार्यालयाकडे असल्याने महापालिका हतबलता दर्शविते. तर कामगार कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडे मनुष्यबळ कमी असल्याची सबब दिली जाते. मराठी पाट्या संदर्भात मनसे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडून गेल्या अनेक महिन्यांपासून पाठपुरावा करीत आहेत. त्यानंतरही मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांवर कारवाई झाली नाही . मराठी पाट्या संदर्भात आता मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज मनसेचे माजी आमदार व शहर प्रमुख प्रकाश भोईर जिल्हाप्रमुख उल्हास भोईर, महिला शहराध्यक्ष कस्तुरी देसाई यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांनी कामगार सहाय्यक आयुक्त विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली, यावेळी कारवाई होत नसल्याचा जाब विचारण्यात आला. मराठी भाषा दिनापर्यंत इंग्रजी पाट्या लावणाऱ्या दुकानदारांवर कारवाई झाली नाही, तर तोडफोड करण्याची सुरुवात सरकारी कार्यल्यापासून करू. त्यानंतर आम्ही दुकाने फोडू अशा इशारा यावेळी मनसेने दिला आहे.