कल्याण - मोहने नजीक असलेल्या एका मंदिरावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी माजी नगरसेवक मुकुंद कोट यांना पाठिंबा दिला आहे. तर आज सायंकाळी मनसे आमदार राजू पाटील ही कारवाई करण्यात आलेल्या मंदिराच्या ठिकाणी पोहचले. त्यांनी ग्रामस्थांची भेट घेतली. अनधिकृत बांधकामे सोडून मंदिरे तोडणार असाल तर उद्रेक होणार,असा सज्जड इशारा आमदार पाटील यांनी महापालिका प्रशासनास सत्ताधाऱ्यांना दिला आहे.
मोहने परिसरातील जुन्या गावदेवी मंदिर जीर्ण झाल्याने त्या मंदिराचा जिर्णोद्धार करण्यासाठी स्थानिकांनी मंदिराचे नव्याने बांधकाम सुरु केले. महापालिकेचे सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी या बांधकामाला बेकायदेशीर ठरवत कारवाई केली. या कारवाई विरेाधात स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले. माजी नगरसेवक कोट यांनी प्रभाग कार्यालयात पा्ेहचून सहाय्यक आयुक्त सावंत यांच्या कानशीलात लगावली. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी माजी नगरसेवक कोट यांच्यासह 15 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर राजकारण तापले आहे. भाजप आमदार चव्हाण यांनी हिंदूत्व आणि मंदिरासाठी कोट यांची भूमीका फार महत्वाची असल्याचे सांगत त्यांना पाठींबा दिला आहे. तर मनसे आमदार पाटील आज कारवाई करण्यात आलेल्या मंदिरात पोहचले. गावकऱ्यांशी चर्चा केली.
या मुद्यावर बोलताना राजू पाटील यांनी सांगितले की, हे अधिकारी आणि त्यांचे आका हे हिंदूत्व विसरले आहेत. हिंदू ह्दयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती दिनानिमित् गावातील मंदिरावर कारवाई झाली. सर्रासपणे अनधिकृत बांधकामे सुरु आहे. ते अधिकारी आणि सत्ताधा:याना दिसत नाही. ज्या अधिका:याने ही कारवाई केली आहे. त्या अधिका:यांने संपूर्ण गावाची आणि समाजाची माफी मागावी. नंतर आम्ही त्यांना कुठे बेकायदा बांधकाम सुरु आहेत. हे दाखवू. त्या बेकायदा बांधकामावर कारवाई करण्याची हिंमत तेव्हा प्रशासनासह मुजोर अधिकाऱ्यांनी ठेवावी असे आव्हान प्रशासनाला आमदार पाटील यांनी दिले आहे.