कल्याण-कल्याण डोंबिवली स्टेशन परिसरात दीडशे मीटरच्या आत फेरीवाले बसतात. त्याचा नागरीकांना त्रास हाेतो. तसेच वाहतूक कोंडी होते. फेरीवाला हटविण्यासाठी महापालिकेने कार्यवाही केली नाही. तर हा प्रश्न आम्ही आमच्या पद्धतीने सोडवू असा इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे. आज आमदार पाटील यांनी महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांची भेट घेतली. या वेळी विविध विषयावर त्यांनी चर्चा करुन तोडगा काढण्याची मागणी केली आहे.पलावा हा आयटीपी प्रकल्प आहे. या प्रकल्पातील नागरीकांना ६६ टक्के जास्तीचा मालमत्ता कर आकारला जातो. हा कर कमी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच घेतला. त्याबद्दल त्यांचे आमदार पाटील यांनी अभिनंदन केले. त्याचबरोबर आज आयुक्तांची भेट घेतली. तेव्हा आमदार पाटील यांनी या प्रकरणी आयुक्तांचेही अभिनंदन केले. अनेक वेळा आयुक्तांसोबत नागरी प्रश्नावर चर्चा केली आहे. काही प्रश्न सुटले आहे. काही सुटलेले नाहीत. फेरीवाला प्रश्न् सुटला नसल्याने आमदार पाटील यांनी आयु्क्तांकडे तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करीत हा प्रश्न सुटला नाही तर आमच्या पद्धतीने सोडविण्याचा इसारा दिला आहे.डोंबिवली पश्चिमेतील मोठा गाव येथील मोठा गाव ठाकूर्ली ते माणकोली खाडी पूलाच्या जोड आणि पाेहच रस्त्याचे आरेखन चुकले असल्याचा मुद्या आमदार पाटील यांनी आयुक्तांकडे उपस्थित केला. याप्रकरणी लवकरच एमएमआरडीए सोबत एकत्रित बैठक लावण्याचे आयुक्तांनी मान्य केले आहे. याशिवाय ठाकूर्ली रेल्वे उड्डाणपूलाची एक बाजूचे काम अर्धवट आहे. हे काम केव्हा मार्गी लागणार असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर आयुक्तांनी या कामातील बाधितांच्या पूनर्वसनाचा प्रश्न मिटविण्यात आला आहे. त्यामुळे हे काम लवकर सुरु केले जाईल असे आश्वासन दिले आहे.डोंबिवली पश्चिमेला विद्युत उपकेंद्र नाही. कोपर येथून जाणारी पश्चिमेची वीज पुरवठा लाईन काही कारणास्तव तुटल्यास डोंबिवली पश्चिम अंधारात जाऊ शकते. पश्चिमेला वीजेचे उपकेंद्र सुरु करण्यासाठी जागा द्यावी अशी मागणी आमदार पाटील यांनी आयुक्तांकडे केली आहे. या मागणीविषयी आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
फेरीवाला प्रश्न सोडविला नाही तर...; आमदार राजू पाटील यांचा केडीएमसीला इशारा, आयुक्तांची घेतली भेट
By मुरलीधर भवार | Published: November 02, 2023 4:26 PM