शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

कल्याण : शर्तभंग नियमित करण्याचा प्रस्ताव दिला नाही तर ५९२ भूखंड होणार सरकार जमा?

By मुरलीधर भवार | Published: November 22, 2022 6:00 PM

प्रांत कार्यालयाकडून नियमानुकूल प्रस्तावांची छाननी सुरु, प्रांत कार्यालयात एकच गर्दी

कल्याण-सरकारने सोसायट्यांना वापरासाठी जे भूखंड दिले होते. त्या सोसायटी धारकांकडून हे भूखंड बिल्डरला विकसित करण्यासाठी दिले. काहींनी ते स्वत: विकसित केले. सरकारने दिलेल्या अटी शर्तीचा भंग झाला आहे. अशा शर्तभंग झालेल्या सोसायटीधारकांनी दंडात्मक रक्कम भरुन त्यांचा भूखंड नियमित न केल्यास त्यांचा भूखंड हा सरकार दफ्तरी जमा करुन घेतला जाणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करणे अपेक्षित आहे. या प्रस्तावांची छाननी कल्याण प्रांत कार्यालयाकडून सुरु करण्यात आली आहे. ही छाननी करुन घेण्यासाठी शर्तभंगाची नोटीस प्राप्त झालेल्या सोसायटीधारकांची प्रांत कार्यालयात कालपासून एकच गर्दी पाहावयास मिळत आहे.

शर्तभंग झालेल्या सोसायटय़ांना नियमीत करण्यासाठी राज्य सरकारने २०१८ साली अध्यादेश काढला होता. त्यानुसार ही प्रक्रिया सुरु होती. आत्ता शर्तभंग केलेल्या सोसायट्या नियमित करण्यासाठी १४ मार्च २०२३ पर्यंत अखेरची मुदत आहे. या मुदतीपूर्वी प्रस्ताव मंजूर झाले नाही. तर प्रस्ताव सादर न करणाऱ्या सोसायट्यांचे भूखंड हे सरकार दरबारी जमा करुन घेतले जातील. कल्याण तालुक्यात ३९ सोसाट्या आहेत. या सोसायट्यांवर ५९२ भूखंड धारक आहे. कल्याण तहसील कार्यालयाकडून शर्तभंग करणाऱ्या जवळ एक हजार जणांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहे. त्यानुसार शर्तभंग करणाऱ्या सोसायट्यांकडून नियमित करण्यासाठी प्रस्ताव सादर केले आहे. या प्रस्तावाची छाननी प्रांत अधिकारी अभिजीत भांडे पाटील यांनी कालपासून सुरु केली आहे. काल १२० जणांनी त्यांची कागदपत्रे आणि प्रस्ताव सादर केले. आज जवळपास १०० जण त्यांचे प्रस्ताव छाननीकरीता सादर करणार आहे. छाननीची ही प्रक्रिया आणखीन पाच दिवस सुरु राहणार असल्याची माहिती नायब तहसीलदार रिताली परदेशी यांनी दिली आहे.

अनेक सोसायट्यांनी शर्त भंग आणि नजराण्याची रक्कम भरण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र छाननीसाठी नोटिसा बजावून छाननीकरीता दिलेली मुदत ही फारच कमी आहे. त्यामुळे नोटीस प्राप्त झालेल्यांची एकच धावपळ उडाली आहे. शर्तभंगकरीता दंडाची रक्कम ही जवळपास ६२ टक्के आकारली जात आहे. मात्र नजराण्याची रक्कम ही १५ टक्के आहे. नजराण्याची रक्कम ही सरकारने माफ करावी अशी काही सोसायटीधारकांनी मागणी केली आहे. याचा सरकारने पुनर्विचार करण्याची गरज आहे.

टॅग्स :kalyanकल्याण