कल्याण-नव्या महिला आयुक्तांची नियुक्ती झाल्यावर मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्वीट केले होते. फेरीव्लायंसारखे आयुक्त येतात. मात्र फेरीवाले हटत नाहीत. मात्र नव्या आयुक्तांची इच्छा शक्ती असल्यास फेरीवाल्यांचा प्रश्न सुुट शकतो. त्यासाठी केवळ अधिकार गाजवायचे आहेत असे प्रतिक्रिया मनसे आमदार पाटील यांनी दिली आहे. नव्या आयुक्त जाखड यांची आज मनसे आमदार पाटील यांनी भेट घेतली. या भेटी पश्चात आमदार पाटील यांनी उपरोक्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मनसे आमदार पाटील यांनी सांगितले की, नव्या महिला आयुक्त जाखड यांची यापूर्वी ज्याठिकाणी काम केले आहे. ते चांगले आहे. कल्याण डोंबिवली ही जुळी शहरे आहे. या शहराच्या विकासासाठीही त्याच चांगलेच काम करतील. त्यांची आज भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच स्वत: आमदार आणि मनसे पक्षाचे आयुक्तांना चांगल्या कामाकरीता नेहमीच सहकार्य असेल असे आमदार पाटील यांनी आयुक्तांना सांगितले. त्यांच्यावर राजकीय दबाव येऊ शकतो का असा प्रश्न आमदार पाटील यांच्याकडे उपस्थित केला असता त्यांनी सांगितले की, आगामी निवडणूकीची वेळ पाहता. त्यांच्यावर दबाव येईल असे वाटत नाही.
कॅसिनेात गेल्याचे मोठया मनाने मान्य करायला पाहिजे हाेते
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे कॅसिनोत गेल्याचा फोटो व्हायरल केला होता. त्यावर मनसे आमदार पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, कॅसिनो हे उत्पनाचे साधन आहे. महाराष्ट्राला लागूनच गोव्यात कॅसिनो सुरु आहे. महाराष्ट्रात उत्पन्नाचे साधन असलेले कॅसिनो सुरु केले नाही. राज्यात उत्पन्नाच्या गोष्टींना विरोध करायचा आणि परदेशात जाऊन कॅसिनोत बसायचे. कॅसिनोत मी सुद्धा गेलो आहे. कॅसिनोत गेलो म्हणजे जुगारच खेळला असे होत नाही. बावनकुळे यांनी मोठ्या मनाने कॅसिनाेत गेल्याचे मान्य करायला हवे होतं.