अनिकेत घमंडी, डोंबिवली: सोमवारी सकाळपासूनच मध्य रेल्वेची वाहतुकीचे तीन तेरा वाजले होते. आधी ९.२५ वाजता ठाण्यात सिग्नल फेल तर संध्याकाळी ५ वाजे दरम्यान मुलुंड दरम्यान सिग्नलचा खांब कोसळला असल्याने वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे आठवड्याचा पहिला दिवशीच चाकरमान्यांना मनःस्ताप सहन करावा लागला.
आधीच कामाच्या ठिकाणी ताण तणाव त्यात मध्य रेल्वेचे वेळापत्रक कायम कोलमडलेले. त्यामुळे प्रवासी हैराण असताना सोमवारी आणखी एक सिग्नल फेल समस्येमुले सकाळी कामावर लेट मार्क संध्याकाळी घरी जाताना लोकल मध्ये अडकून बसावे लागले, हजारो प्रवाशांना स्थानकात अडकावे लागले. महिला, ज्येष्ठ नागरिक, पुरुष प्रवासी यांचे अतोनात हाल झाले.
त्यात अवकाळी पावसाने मुंबई, ठाणे जिल्ह्याला झोडपले त्याचाही फटका सामान्यांना बसला, त्यामुळे सोमवार नकोसा झाला असल्याची संतापाची भावना प्रवाशांमध्ये होती.
रविवारी मेगाब्लॉक असतो त्यावेळी या सर्व तांत्रिक बाबी तपासणी झाली नाही का? याची सखोल चौकशी करणे गरजेचे असल्याचे मत संतप्त प्रवाशांनी व्यक्त केले