कल्याण: केंद्र सरकारने सुकन्या योजना सुरु केली आहे. या योजनेची २३० कार्ड इयत्ता पहिली ते चौथीच्या मुलींना राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि कल्याणचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यानी वाटप केली आहेत. माजी आमदार शिंदे यांचा समाज कार्यात मोठे नाव आहे. देश पातळीवर ड्रेगिस्ट्र संघटनेचे अध्यक्ष आहेत.
सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी सैनिकी शाळा आणि मुलांसाठी अभ्यासिका सुरु केली आहे. त्याचबरोबर गरजू रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदत आणि औषधे पुरविली आहे. सामान्य कुटुंबातील २३० मुलींना केंद्र सरकारच्या सुकन्या योजनेचे कार्ड काढून दिले आहे. त्यासाठी लागणारे प्रत्येक मुलीचे २५० रुपये शिंदे यांनी भरले आहेत. या मुली जेव्हा १० किंवा १२ वीला जातील तेव्हा त्यांच्या खात्यात योजनेच्या माध्यमातून ५ लाख रुपयांची रक्कम जमा झालेली असेल.
त्यासाठी पालकांनीही पोटाला चिमटा काढून मुलींच्या हितासाठी १ हजार रुपये भरले पाहिजेत. या योजनेत जमा केलेल्या रक्कमेवर चक्रवाढ पद्धतीने व्याज मिळते. ही रक्कम मुलीच्या उच्च शिक्षणासाठी, लग्न कार्याकरीता आणि एखादा व्यवसाय सुरु करुन स्वयंरोजगारीत होण्यास मदतीची ठरणार आहे असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला आहे. हा कार्यक्रम शिंदे यांच्या निवासस्थानी असलेल्याच्या त्याच्या कार्यालयात काल पार पडला.