मुरलीधर भवार,कल्याण : शहराच्या पूश्चिम भागातील मल्हारनगरात सुयोग आणि स्नेहांकित सोसायटीला पाणी येत नव्हते. या सोसायटीला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असता जलवाहिनीत मृत कबूतराचे अवशेष सापडले. हे पाहून नागरिकांना धक्काच बसला आहे.
या घटनेवरुन जल कुंभात कबूतर पडले होते. त्याचा मृत अवशेष जलवाहिनीत अडकल्याने जलवाहिनी तुंबली होती. या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी मनसेचे विभागाध्यक्ष कपील पवार यांनी केली आहे. या भागाला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी ही सुभाष मैदान येथून येते. सुभाष मैदानात महापालिकेचा जलकुंभ आहे. कल्याण स्टेशन आणि बाजारपेठ परिसरात अन्नधान्याची दुकाने आहे. या दुकानाच्या परिसरात कबुतरांचे थवे असते. ही कबुतरे रात्रीच्या वेळी बड्या इमारतीच्या छतालगत, खिडक्यांची तावदाने आणि जलकुंभावर आसरा घेतला. त्यापैकीच एक कबूतर मरुन जलकुंभात पडले असावे. ते जलवाहिनीत वाहून एका ठिकाणी अडकले असावे. जलवाहिनी दुरुस्तीचे काम केल्यावर ही बाब समोर आली. जल कुंभाची स्वच्छता केली पाहिजे. ज्या जलवाहिनीत मृत कबूतराचे अवशेष मिळून आले. त्या ठिकाणच्या नागरिकांना दूषित पाणी पूरवठा झालेला आहे. त्यानंतर पाणीच येणे बंद झाल्यावर जलवाहिनी दुरुस्ती केल्यावर सत्य बाहेर आले. या प्रकरणी दोषी अधिकाऱ््याच्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसेचे विभागाध्यक्ष पवार यांनी केली आहे.