डोंबिवली:
महाराष्ट्र भूषण तिर्थरूप डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित बुधवरीबकल्याण पश्चिम येथे महास्वच्छता अभियान संपन्न झाले.संपूर्ण कल्याण, डोंबिवली शहरं स्वच्छ करण्यात आले, त्याची सुरुवात कल्याणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून करण्यात आली. तसेच न्यायालय व तहसील कार्यालय परिसरातही स्वच्छता करण्यात आली. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी निमित्त सामाजिक उपक्रम म्हणून महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हे आदर्श आणि सुसंस्कारित समाज घडविण्यासाठी नेहमी सक्रिय असते, सातत्याने वेगवेगळे उपक्रम राबविले जातात, त्यामध्ये जलसंधारण, जलयुक्त शिवार पासून अनेक उपक्रमांचा समावेश आहे. प्रतिष्ठानचे सामाजिक योगदान अभूतपूर्व असल्याचे मत माजी आमदार तथा भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांनी व्यक्त केले.कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाच्या उत्तरेकडील गेटच्या बाजूला असलेल्या विहिरीला मुबलक पाणी असून ते स्वच्छ करून, उपसा काढून, गाळ काढून देण्याची विनंती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त अतुल पाटील यांना श्री सदस्यांनी केली, त्यांनी ते स्वच्छ करून देण्याचे सांगितले आहे. जेणेकरून त्या विहिरीच्या पाण्याचा उपयोग स्वच्छतागृह व झाडांना होईल. न्यायालयाच्या परिसरामध्ये पक्षकारांसाठी असलेले स्वच्छतागृह मोठे असून पाण्याअभावी त्या ठिकाणी दुर्गंधी आहे. विहिरीचा पाण्याचा उपयोग करून ते वापरात आणले जाईल आणि स्वच्छताही राहील अशी मागणी केली.यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त अतुल पाटील, दिवाणी वकील संघटनेचे उपाध्यक्ष रासकर, तसेच ॲड. बोंद्रे , कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड.प्रकाश जगताप, ग्रंथपाल ॲड. भरत पाटील, कल्याण शहर बैठकीतील श्री सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. डोंबिवलीतही श्री सदस्यांनी शहरात इंदिरा गांधी चौक ते नांदीवली, एमआयडीसी भाग, ठाकुर्ली, फडके पथ, पश्चिमेला बावनचाल, सुभाष।रोड, महात्मा फुले रोड, घनश्याम।गुप्ते, पंडित दीनदयाळ पथ, कोपर आदी भागात स्वच्छता अभियान राबवले.