डोंबिवली: कल्याण शीळ रस्त्यावरील हाेत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे डोंबिवलीतील एका नामांकित शाळेच्या विद्यार्थ्यांना सुट्टी द्यावी लागते. ही लोकप्रतिनिधींसाठी लज्जास्पद गोष्ट आहे अशी संतापजनक प्रतिक्रिया मनसे आमदार राजू पाटील यांनी दिली आहे. मेट्रोचे काम ज्या प्रकारे सुरु आहे. त्याठिकाणी ट्रॅफिक जाम होणारच आहे. या बेशिस्तपणे हे काम सुरु आहे. मागच्याच आठवड्यात मी त्याठिकाणी पाहणी केली होती. याठिकाणी शंभर टक्के वाहतूक कोंडी होणार आहे, असं म्हणत मनसेचे आमदार राजू पाटील यांनी संताप व्यक्त केला.
या रस्त्याने अवजड वाहने अजूनही बंद केलेली नाही. बॅरेकेट्स लावले आहे. त्यानंतर जो रस्ता सोडला पाहिजे. रस्त्याची एक लेन काही ठिकाणी बवनून झालेली नाही. त्याठिकाणी शेतकऱ्यांना मोबदला दिलेला नाही. त्यामुळे काम रखडलेले आहे. हा रस्ता एमएमआरडीएचा आहे. मेट्रो एमएमआरडीएची आहे. त्यांचे कुठेही नियोजन दिसत नाही. स्ट्रीट लाईटचे पोल लावले. मध्ये रस्ता केला. डिव्हाडर लावले. जनतेच्या पैशाची नासाडी चालू आहे. हे त्यादिवशी ही मी बोलले. आत्ता खासदार श्रीकांत शिंदे यांना फोन केला होता. यासाठी बैठक घ्यावी लागेल. काही पर्यायी रस्ते केल्याशिवाय हे काम सुरु करु नये. त्यांनी यासंदर्भात उद्या बैठक ठेवली आहे. मला जसे मेसेज आले. तसे त्यांनाही गेले. ट्रॅफिकमुळे डोंबवलीतील नामांकित शाळेच्या पोरांना सुट्टी द्यावी लागते. ही लोकप्रतिनिधी म्हणून आमच्यासाठी लज्जास्पद गोष्ट आहे. यासाठी गुरुवारी बैठक ठेवली आहे. यावर काही तरी मार्ग काढू असे राजू पाटील यांनी सांगितले.