कल्याण-ग्रामीण भागातील पाणी टंचाई कायम स्वरुपी नष्ट व्हावी यासाठ जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक गावाला स्वतंत्र पाणी याेजना मंजूर करण्यात आल्या असून या याेजनेची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे केल जावे. याेजनेच्या कामावर विशेषतः महिला वर्गाने लक्ष ठेवावे असे आवाहन भाजप आमदार किसन कथाेरे यांनी येथे केले.
मानिवली गावात जल जीवन मिशन अंतर्गत दीड काेटी रुपये खर्च करुन पाणी पुरवठा याेजना राबविली जात आहे. या कामाची पाहणी काल आमदार कथाेरे यांनी केली. या प्रसंगी चंदू बोष्टे, संजय शेलार, निलेश शेलार, रवींद्र घोडविंदे, रेश्माताई मगर, चंद्रकांत गायकर, अरविंद मिरकुटे, सविता मिरकुटे, नवनाथ मिरकुटे , गोरखनाथ बांधणे, जी आर खुटेमाटे आदी मान्यवर उपस्थित हाेते.
यावेळी कथाेरे यांनी सांगितले की, मानिवली गावात आठ काेटी रुपये खर्च करुन एमएमआरडीएच्या माध्यमातून काॅन्क्रीट रस्ता तयार केला जात आहे. रस्त्याच्या आड येणारी बांधकामे ताेडण्यात यावी. कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांकरीता एमएमआरडीएने ९५ काेटीचा निधी दिला आहे. दहागांव मधील गावांतर्गत रस्त्यासाठी साडेआठ कोटी रुपये मंजूर केले आहेत, तसेच बानधणे पाडा येथेही सिमेंट कॉक्रीट चे रस्ते उभारण्यात येणार आहेत.
नवगाव व बापसई गावातील रस्त्याची पाहणी करत या दोन्ही गावातील रस्त्यासाठी ५ कोटी निधी मजूर करण्यात आलेला आहे. बापसई येथील व्यायाम शाळेचे उदघाटन आमदार कथोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"