शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे इगतपुरी अप यार्ड येथे एनडीआरएफसह संयुक्त मॉक ड्रिल 

By अनिकेत घमंडी | Published: April 22, 2023 5:28 PM

बर्निंग कोचमध्ये प्रवासी अडकले असताना ही परिस्थिती निर्माण करण्यात आली. 

डोंबिवली:  मुंबई विभाग, मध्य रेल्वे दरवर्षी मोठ्या अपघाताच्या वेळी सतर्कता आणि प्रतिसाद वेळ तपासण्यासाठी राष्ट्रीय आपात्कालीन प्रतिसाद दल (NDRF) सोबत संयुक्त कवायत करते.  या संदर्भात दि.२२.४.२०२३ रोजी इगतपुरी अप यार्ड येथे संयुक्त मॉक ड्रिल घेण्यात आले.  एक कृत्रिम अपघाताची परिस्थिती तयार केली गेली ज्यामध्ये, एक डबा पेटवून दिला गेला आणि रुळावरून घसरवला. बर्निंग कोचमध्ये प्रवासी अडकले असताना ही परिस्थिती निर्माण करण्यात आली. 

सकाळी ११.२७ वाजता ड्रिल सुरू करण्यात आली आणि लगेचच कोचला आग लागली.  ११.२८ वाजता मुंबई विभागाच्या   नियंत्रण कक्षातील क्षेत्रीय कर्मचार्‍यांकडून संदेश देण्यात आला. नियंत्रण कक्ष तात्काळ कार्यान्वित झाले आणि राष्ट्रीय आपात्कालीन प्रतिसाद दल (NDRF), रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि रेल्वेच्या अपघात निवारण ट्रेनला आणि सर्व संबंधितांना संदेश देण्यात आला.  राष्ट्रीय आपात्कालीन प्रतिसाद दल (NDRF) ११.३६ वाजता पोहोचले.  घटनास्थळी जाऊन तात्काळ नागरी संरक्षण आणि अग्निशमन दलाच्या मदतीने बचावकार्य सुरू केले.  कोच वरून आणि  खिडक्यावरून  कट करण्यात आले.  राष्ट्रीय आपात्कालीन प्रतिसाद दल (एनडीआरएफ)चे जवान प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी कोचमध्ये घुसले.  

आग विझवण्यासाठी रेल्वे क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी अग्निशामक यंत्राचा वापर केला.  रेल्वे रुग्णवाहिका ११.४८ वाजता घटनास्थळी आणि अग्निशमन दल ११.३५ वाजता पोहोचले.  रेल्वेच्या आरपीएफने प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफला मदत केली.  अग्निशमन दलाच्या जवानांनी डब्यात प्रवेश करून आग पूर्णपणे विझवली.  सर्व प्रवाशांना १२.४० वाजता बाहेर काढण्यात आले, जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले आणि रेल्वेच्या डॉक्टरांनी त्यांच्या आरोग्याची तपासणी केली.  सर्व स्टेकहोल्डर्स प्रतिसादात्मक आणि जलद असल्याचे आढळले आणि संपूर्ण परिस्थिती १ तासात नियंत्रित करण्यात आली.  या कवायतीमुळे विविध आपत्ती प्रतिसाद एजन्सीसह रेल्वेचे संयुक्त ऑपरेशन सुरळीत झाले आणि वास्तविक जीवनात अशा प्रात्यक्षिकाची मोठ्या प्रमाणात मदत होईल.

मुंबई विभागाचे उद्दिष्ट शून्य अपघात आणि अशी कोणतीही घटना घडल्यास त्वरित प्रतिसाद देण्याचे आहे.  अपघाताची पूर्वतयारी आणि जलद प्रतिसाद यासाठी या कवायती रेल्वेद्वारे संयुक्तपणे केल्या जातील. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या संरक्षा विभागाने या कवायतीचे संयोजन केले.  यावेळी एम एल विष्णोई, एडीआरएम (परीचालन),  लाल कुमार के, वरीष्ठ विभागीय संरक्षा अधिकारी, मुंबई विभाग;  आदिश पठानिया, वरीष्ठ विभागीय परीचालन  व्यवस्थापक (समन्वय), मुंबई विभाग;  डॉ.  रजनीश कुमार, सहायक मुख्य चिकित्सा अधिक्षक, इगतपुरी;  जी.बी.गजभिये, वरिष्ठ विभागीय मॅकेनिकल इंजीनियर/फ्रेट तथा परीचालन  उपस्थित होते.  डॉ.ए.के.सिंग, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मुख्यालय यांनी कोणत्याही अफवा आणि चुकीची माहिती टाळण्यासाठी मीडिया एजन्सींशी समन्वय साधला. 

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीrailwayरेल्वे