कल्याण : माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि विद्यमान दिव्यांग क्रिकेट असोसिएशन मुंबईचे सचिव कल्पेश गायकर यांना दिव्यांग क्रिकेटमधील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘दीपक लोहिया स्मृती पुरस्कार २०२३-२४’ प्रदान करण्यात आला.
आगामी काळात दिव्यांग क्रिकेटला पुढे नेण्यासाठी भारतीय दिव्यांग क्रिकेट परिषदेतर्फे (डीसीसीआय) राजस्थानमधील जयपूर येथे शनिवार आणि रविवार असे दोन दिवशीय वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डीसीसीआयचे सरचिटणीस रवी चव्हाण, डीसीसीआयचे मुख्य संरक्षक प्रतापसिंह चव्हाण, डीसीसीआयच्या कॉर्पोरेट कम्युनिकेशन कमिटीचे अध्यक्ष राजेश भारद्वाज, पीसीसीएआयचे अध्यक्ष सुरेंद्र लोहियाजी, डीसीसीआय ऑपरेशन्स कमिटी नितेंदर सिंग, डिफरेंट इंडिपेंडंट क्रिकेट अध्यक्ष (राजस्थान) जोशना चौधरी उपस्थित होते. यावेळी, संपूर्ण भारतात दिव्यांग क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी विभागीय प्रतिनिधींची निवड करण्यात आली.
दिव्यांग क्रिकेट असोसिएशन, मुंबईचे सचिव कल्पेश गायकर यांच्याकडे पश्चिम विभागीय प्रतिनिधी पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. ज्यात मुंबई, महाराष्ट्र, गुजरात, बडोदा, सौराष्ट्र अशा पाच राज्य क्रिकेट संघटनांचा समावेश आहे. दीपक लोहिया स्मृती पुरस्कार मिळाल्यानंतर संस्थेचे कल्पेश गायकर यांनी संस्थेचे सर्व पदाधिकारी, जिल्ह्यातील सहकारी व खेळाडूंनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
झोन आणि त्यांचे निवडलेले प्रतिनिधी :
पश्चिम विभाग - कल्पेश गायकर
पूर्व क्षेत्र - राकेश कुमार
नॉर्थ झोन - अविनाश शर्मा
दक्षिण विभाग – मधुसूदन
मध्य विभाग - संजय भोसकर आणि संजय तोमर.