कल्याण : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अकदस चंदू (३२) याला कल्याणन्यायालयाने बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अकदसने वर्षभरापूर्वी एका अल्पवयीन मुलीसोबत असा प्रकार केला होता. बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी एक अल्पवयीन मुलगी दुकानात गेली होती. तहान लागल्याने जवळच पाणी पिण्यासाठी मुलगी गेली. मुलीला एकटीला पाहून पाठीमागून आलेल्या अकदसने तिचे तोंड दाबत जबरदस्तीने तिला एका ठिकाणी घेऊन गेला.
त्याठिकाणी मुलीवर अतिप्रसंग करायला सुरुवात केली. या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने आरडाओरडा सुरु केला. त्यामुळे, अकदसने तेथून पळ काढला. घडला प्रकार मुलीने आपल्या घरी जाऊन सांगितला. मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून बाजारपेठ पोलिसांनी तक्रार दाखल करत अकदसला अटक केली. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.