शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

Kalyan: केडीएमसीच्या कर्मचा-यावर खंडणीचा गुन्हा! आरोपींमध्ये अन्य तिघांसह माहिती अधिकार कार्यकर्त्याचा समावेश

By प्रशांत माने | Published: August 01, 2024 8:00 PM

Kalyan News: बांधकाम व्यावसायिकाकडून ४१ लाख रूपये रोख आणि चार सदनिका जबरदस्तीने खंडणी स्वरूपात घेतल्याच्या आरोपाखाली केडीएमसीच्या एका कर्मचा-यासह अन्य चौघांवर विष्णुनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. आरोपींमध्ये एका माहिती अधिकार कार्यकर्त्याचाही समावेश आहे.

-  प्रशांत माने

डोंबिवली -  बांधकाम व्यावसायिकाकडून ४१ लाख रूपये रोख आणि चार सदनिका जबरदस्तीने खंडणी स्वरूपात घेतल्याच्या आरोपाखाली केडीएमसीच्या एका कर्मचा-यासह अन्य चौघांवर विष्णुनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. आरोपींमध्ये एका माहिती अधिकार कार्यकर्त्याचाही समावेश आहे.

विनोद लकेश्री, प्रशांत शिंदे, महेश निंबाळकर, विलास शंभरकर आणि परेश शहा अशी गुन्हा दाखल झालेल्या पाच जणांची नावे आहेत. यातील लकेश्री हे केडीएमसीत वाहन चालक आहेत तर निंबाळकर हे माहीती अधिकार कार्यकर्ते आहेत. बांधकाम व्यावसायिक प्रफुल्ल गोरे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. गोरे यांच्या तक्रारीनुसार त्यांचे डोंबिवलीत डिसेंबर २०१८ पासून ते ३० जुलै २०२४ या कालावधीत कुंभारखाणपाडा, देसलेपाडा, कोपररस्ता, गोग्रासवाडी भागात बांधकाम प्रकल्प सुरू होते. हे बांधकाम प्रकल्प बेकायदेशीर आहेत आणि ते तोडण्याबाबत सोशल मिडीयावर तसेच केडीएमसीत व इतर सरकारी कार्यालयांमध्ये संबंधितांनी तक्रार अर्ज केले. तक्रार अर्ज मागे घेण्यासाठी माझ्याकडून जबरदस्तीने ४१ लाख रूपयांची रोकड आणि डोंबिवली येथील चार सदनिका जबरदस्तीने घेतल्याचा आरोप गोरे यांनी पाच जणांवर केला आहे. या तक्रारीवरून संबंधितांवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास ठाणे खंडणी विरोधी पथक करीत आहेत.

लकेश्री यांच्यावर २७ नोव्हेंबरला प्राणघातक हल्ला झाला होता. या प्रकरणात चार मारेक-यांना अटक करण्यात आली. तपासात मोगली नामक व्यक्तीने हल्ल्याची सुपारी दिल्याचे समोर आले होते. परंतू सुपारी देणारा मोगली आणि या हल्ल्यामागचा सूत्रधार आठ महिने उलटूनही पोलिसांना सापडलेला नाही. दरम्यान लकेश्री यांच्यावर आता खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

आवाज दाबण्यासाठी खोटा गुन्हाआपण डोंबिवलीतील सर्व बेकायदा बांधकामांच्या तक्रारी अनेक वर्ष पालिकेत करत आहोत. त्याविरूध्द आपली उपोषण सुरू आहेत. आपण बेकायदा बांधकामांविरोधात आवाज उठवितो म्हणून आपला आवाज दाबण्यासाठी आपणास खोटया गुन्हयात अडकविण्याचा हा प्रयत्न आहे अशी प्रतिक्रिया माहीती अधिकार कार्यकर्ते महेश निंबाळकर यांनी दिली. दरम्यान विनोद लकेश्री यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याणCrime Newsगुन्हेगारी