शहरं
Join us  
Trending Stories
1
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
2
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
3
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
4
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
5
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
6
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
7
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
8
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
9
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
10
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
11
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
12
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
13
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
14
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
15
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
16
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
17
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
18
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
19
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
20
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?

कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे रेल्वे प्रशासनाच्या विरोधात भीख मांगो आंदोलन

By अनिकेत घमंडी | Published: March 11, 2024 12:45 PM

लांबपल्यांच्या गाड्यांना प्राधान्य, उपनगरी प्रवाशांकडे दुर्लक्ष या धोरणाविरोधात भूमिका

डोंबिवली - जास्त निधी, नफा देणाऱ्या प्रवाशांसाठी लांबपल्यांच्या गाड्या, मालगाड्या यांना प्राधान्य देऊन उपनगरी रेल्वे प्रवाशांच्या समस्या, मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या रेल्वे प्रशासनाच्या दुटप्पी विरोधात कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे रेल्वे प्रशासनाच्या विरोधात भीख मांगो आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे सर्व स्थानकात ३१ मार्च पर्यंत भीक मागून जमा होणारा पैसा हा रेल्वे प्रशासनाला देण्यात येणार असल्याचे पत्र रेल्वे मंत्रालय मध्य रेल्वेचे मुख्यव्यवस्थापकांना दिल्याचे संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी सांगितले.

वर्षानुवर्षे कसारा -कर्जत मार्गांवरील रेल्वे प्रवास हा वाढत्या नागरीकरणामुळे वाढलेली गर्दीमुळे दिवसेंदिवस यातनादायक, नकोसा झालाय. त्या मार्गांवर निधीअभावी प्रवाशांना प्राथमिक आणि मूलभूत सुविधा मिळत नाहीत. या मार्गांवर मेल एक्सप्रेस मालवाहतूक जादा गाड्या असो वा श्रीमंतांकरिता वंदे भारत सारख्या ट्रेन्स चालवल्या जात आहेत. त्या तुलनेत ६ वर्षांपासून एकही जादा लोकल फेरी चालविली जात नाही. ज्या सुरु आहेत त्या पण वेळापत्रकाप्रमाणे चालवत नाहीत. रोज सुमारे २० मि. नियोजित वेळापत्रकाच्या उशिरा लोकल धावत असल्याने सामान्यांना कामाच्या ठिकाणी लेटमार्कला सामोरे जावे लागते असं संघटनांनी सांगितले. 

त्याऐवजी मेल एक्सप्रेस मालवाहतूक, वंदे भारत सारख्या गाडयांना चालविण्यास प्राधान्यक्रम दिला जातो. नवीन मार्गीका विस्तारिकरण होत नाही तोपर्यंत या भागात जादा लोकल फेऱ्या वाढविणे शक्य नाही असे उत्तर रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात येते. थर्ड कॉरिडॉर बनवण्यासाठी निधी मिळत नसेल तर सामान्य।प्रवाशांकडून भीक मागुन उभा करण्याशिवाय पर्याय नाही असे घनघाव यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला.