- मुरलीधर भवार
कल्याण - शहरातील नामांकित बिल्डर मंगेश गायकर यांच्याकडील लायसन असलेल्या रिव्हॉल्वरमधून मिस फायर झाल्याने त्यांच्या हाताच्या करंगळीला दुखापत झाली आहे. या घटनेत त्याचा मुलगा श्यामल हा देखली जखमी झाला आहे. बिल्डर गायकर यांच्यासह त्याच्या मुलावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
आज दुपारच्या सुमारास बिल्डर गायकर हे त्यांच्या कार्यालयात उपस्थित होते. त्यांचे जुने रिव्हॉल्वर बदलून नवे रिव्हा’ल्वर घ्यायचे होते. रिव्हॉल्वरची आदलाबदल करताना जुन्या रिव्हॉल्वरमधील गोळया काढण्यात आल्या. त्यापैकी एक गोळी तशीच त्यात राहिली. त्यांनी जुन्या रिव्हॉल्वरचा ट्रीगर दाबला असता त्यातील गोळी त्यांच्या हाताच्या करंगळीला दुखापत झाली. गोळी काचेवर लागल्याने काच फुटून गायकर यांच्या मुलगा श्यामल याच्या पायाला दुखापत झाली. ही घटना घडता गायकर आणि त्यांच्या मुलाला तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्या दोघांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर पुढील उपचार सुरु आहेत.
या घटनेची माहिती मिळताच कल्याणचे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यानी घटनास्थळास भेट दिली. तसेच त्यांनी रुग्णालयात जाऊन बिल्डर गायकर यांच्यास त्यांच्या मुलाची भेट घेतली. भेटी पश्चात उपायुक्त झेंडे यांनी सांगितले की, लायसन्स वेपन साफ करीत असताना ही घटना घडली आहे. या घटनेत बिल्डर व त्याचा मुलगा जखमी झाला आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहे. घटना ज्या ठिकाणी घडली. त्या ठिकाणचे सीसीटीव्ही तपासण्यात येतील. चौकशी अंती नेमका काय प्रकार घडला आहे ? हे स्पष्ट होणार आहे.