शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Kalyan: शिवजयंतीच्या निमित्ताने कल्याणच्या महादुर्ग ऍडव्हेंचरने किल्ले शिवनेरीवर केली जनजागृती

By मुरलीधर भवार | Published: February 18, 2023 1:57 PM

Kalyan: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कल्याणमधील  साहसी संघ आणि नूतन ज्ञानमंदिर शाळेच्या प्रयत्नांने किल्ले शिवनेरीवर जनजागृती मोहीम महादुर्ग अॅडव्हेंचर वतीने करण्यात आली.

- मुरलीधर भवार

कल्याण- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कल्याणमधील  साहसी संघ आणि नूतन ज्ञानमंदिर शाळेच्या प्रयत्नांने किल्ले शिवनेरीवर जनजागृती मोहीम महादुर्ग एॅडव्हेंचर वतीने करण्यात आली.

जनजागृती मोहीम असल्याने विद्यार्थ्यांनी हातात "गडकिल्ले वाचवा" अश्या आशयाचे आवाहन करणारे फलक हातात घेऊन जानजागृती केली गेली.   किल्ले शिवनेरीवरील शिवजन्मस्थळी मुलांच्यावतीने सांस्कृतिक गाणी ही म्हटली. या कार्यक्रमात  दीडशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शाळेच्या वतीने  शिक्षक ज्योत्स्ना गजरे, ममता वसावे, तृप्ती परदेशी, सुषमा मोटघरे, विजया सणस, विकास चव्हाण, दिनेश प्रधान आणि संजय जाधव उपस्थित होते. महादुर्ग ऍडव्हेंचर ह्यांच्या वतीने भूषण पवार, नितेश पाटील, सागर डोहळे, अक्षय जमदरे, कल्पेश बनोटे, विकी बुरकुले, अक्षय घरत, योगेश शेळके आणि उज्वला शेळके उपस्थित होते. जनजागृती मोहिमेला नूतन ज्ञानमंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी गागरे यांनी सहकार्य केले.

महादुर्ग संघाला सह्याद्रीच्या खोऱ्यात साहसी खेळ तसेच गडकिल्ले अभ्यासाचा अनुभव पाठीशी आहे. त्यामुळे गडकोटांची होत चाललेली दुरवस्था पाहता येणाऱ्या युवा पिढीत गडकोटांना एक पर्यटन स्थळ म्हणून न पाहता एक ऐतिहासिक वास्तू म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन रूजू व्हावा ह्याची जबाबदारी आपण सर्वांनी घेतली पाहिजे असे महादुर्गच्या वतीने भूषण पवार ह्यांनी सांगितले.

टॅग्स :kalyanकल्याणStudentविद्यार्थीShivjayantiशिवजयंती